पोलिसांना मिळणार लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:56 IST2017-07-27T06:56:54+5:302017-07-27T06:56:57+5:30
पुणे जिल्हा पोलीस सहकारी क्रेडिट सोसायटीच्या नफ्यामधून ४ कोटी रुपयांची २० टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्यावरून रंगलेल्या वादामुळे सभासदांना अद्याप लाभांश देण्यात आलेला नव्हता.

पोलिसांना मिळणार लाभांश
पुणे : पुणे जिल्हा पोलीस सहकारी क्रेडिट सोसायटीच्या नफ्यामधून ४ कोटी रुपयांची २० टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्यावरून रंगलेल्या वादामुळे सभासदांना अद्याप लाभांश देण्यात आलेला नव्हता. मात्र, ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडल्यामुळे शेकडो पोलिसांनी आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, येत्या २९ जुलै रोजी सभासदांना लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार, पोलीस क्रेडिट सोसायटीच्या नफ्यातील २० टक्के रक्कम कल्याण निधीसाठी देण्याबाबत आयुक्तालय पातळीवरून दबाव टाकण्यात येत आहे. हा निधी देण्यासाठी सोसायटीने नकार दिला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या वादामुळे दरवर्षी जून महिन्यात वितरीत केला जाणारा लाभांश अद्यापही वाटण्यात आलेला नसल्याने पोलिसांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. पोलीस आयुक्तालयामधील सोसायटीचे कार्यालय बाहेर हुसकावण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू झाल्याने कर्मचाºयांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत, बुधवारी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर शेकडो पोलीस कर्मचारी आणि अधिकाºयांनी लोकमतचे आभार व्यक्त केले.