पोलीस पाटील सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:00+5:302021-07-15T04:09:00+5:30

जुन्नर तालुका गावकामगार पोलीस पाटील संघाचे वतीने आळे येथील मृत्यू झालेले गावकामगार पोलीस पाटील सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना ४३ ...

Police provide financial assistance to the family of Patil Sunil Pawar | पोलीस पाटील सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

पोलीस पाटील सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

जुन्नर तालुका गावकामगार पोलीस पाटील संघाचे वतीने

आळे येथील मृत्यू झालेले गावकामगार पोलीस पाटील सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना ४३ हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

आळेचे पोलीस पाटील सुनील पवार यांना कोरोना आजार झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय जुन्नर तालुका गावकामगार पोलीस पाटील संघाने घेतला. रामकृष्ण गागरे व गणेश पाटील चिलप यांनी याकामी पुढाकार घेतला. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या हस्ते मृत सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना ही मदत देण्यात आली. या वेळी पोलीस पाटील संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव पराड, सदस्य किरण भोर, अशोक मातेले, तालुकाध्यक्ष तान्हाजी दिवटे, उपाध्यक्ष राहुल पाटील हांडे, इरफान तांबोळी, रामकृष्ण गागरे, खोकराळे पाटील, शिंदे पाटील, शुभांगी काकडे, ओतूर अध्यक्ष अमित ठोसर, जगन्नाथ कुमकर, संकेत जोरी, गणेश चिलप आदी गावकामगार पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिवंगत सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना मदतनिधी देताना पोलीस निरीक्षक मधुकर पवार व पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी.

Web Title: Police provide financial assistance to the family of Patil Sunil Pawar