शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकावर कोयत्याने हल्ला करणारा विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 18:07 IST

सुनील भोर हा विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागला असून वाडेबोल्हाई येथील डोंगरावर दिवसभर थांबल्याने भूक व थंडीमुळे पहाटे घरी परतल्यानंतर अटक केली.

ठळक मुद्दे वार करून सुनील भोर फरार झाल्यानंतर वाडेबोल्हाई परिसरात एकाच गोंधळ उडाला होता. शिक्षकावर हल्ला केल्यानंतर सुनील भोर याने वाडेबोल्हाई येथील डोंगरावर आसरा घेतला होता.जेवण केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

वाघोली : वाडेबोल्हाई येथील दोन शिक्षकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेला सुनील भोर (वय १९, रा. वाडेबोल्हाई) हा विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागला असून वाडेबोल्हाई येथील डोंगरावर दिवसभर थांबल्याने भूक व थंडीमुळे पहाटे घरी परतल्यानंतर अटक केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्या बरोबरच शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी माता विद्यालयामध्ये अकरावीत शिकणार्‍या सुनील भोर या विद्यार्थ्याने केस व गैरवर्तणुकीबद्दल समज देवून अपमान केल्याचा राग मनामध्ये धरून धनंजय आबनावे व दर्शन चौधरी या शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली होती. वार करून सुनील भोर फरार झाल्यानंतर वाडेबोल्हाई परिसरात एकाच गोंधळ उडाला होता. दोन्ही जखमी शिक्षकांना उपचारासाठी वाघोलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी धाव घेवून पोलिसांनी भोर पळाला असल्याच्या दिशेने तपास केला होता. त्याचप्रमाणे आसपासच्या गावामध्ये दिवसभर व रात्री पोलीस त्याचा शोध घेत होते. दुसर्‍या दिवशी पहाटेच्या वेळी सुनील घरी आला होता. सुनील घरी आल्याची बातमी पोलिसांना समजल्यानंतर पोलीस हवालदार बाळासाहेब गाडेकर व मोहन अवघडे यांनी त्याला ताब्यात घेवून अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता शिक्षकांनी अपमान केल्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे भोरने कबूल केले. हल्ला केल्यानंतर डोंगरावरच त्याने एकट्यानेच आसरा घेतला होता.शिक्षकाला मारहाण करण्याबरोबरच जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याने सुनील भोरवर खुनाचा प्रयत्न व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धनंजय आबनावे यांच्यावर उपचार सुरु असून दर्शन चौधरी यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  भुकेने व्याकूळशिक्षकावर हल्ला केल्यानंतर सुनील भोर याने वाडेबोल्हाई येथील डोंगरावर आसरा घेतला होता. शुक्रवारी दुपारी व रात्री पाउस पडल्याने डोंगरावर त्याला थंडी भरून आली होती. त्याचबरोबर दिवसभर काहीही खाल्ले नसल्याने तो भुकेने व्याकूळ झाला होता. जेवण केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस