पारधी समाजातील मुलगी झाली पोलीस
By Admin | Updated: August 6, 2014 23:11 IST2014-08-06T23:11:30+5:302014-08-06T23:11:30+5:30
बारामती तालुक्यातील सोमेश्वर गावामध्ये राहणारी संगीता राजेंद्र काळे हिची ठाणो शहर विभागातून पोलीस भरतीसाठी निवड झाली आहे.

पारधी समाजातील मुलगी झाली पोलीस
>माळेगाव : जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेला.. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कायमच वंचित राहिलेला पारधी समाज.. सर्वसामान्य पांढरपेशा समाजाच्या नजरेत उपेक्षित असलेल्या या समाजातील संगीता काळे या मुलीने जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सरावातील सातत्याच्या जोरावर पुणो जिल्ह्यातील पारधी समाजातून पहिली महिला पोलीस होण्याचा मान मिळवला आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर गावामध्ये राहणारी संगीता राजेंद्र काळे हिची ठाणो शहर विभागातून पोलीस भरतीसाठी निवड झाली आहे.
अपघातामध्ये वडिलांचे छत्र हरपल्याने संगीता खचून गेली होती. आत्महत्येसारखे विचारही तिच्या मनात आले होते. सुरुवातीपासूनच पोलीस भरतीचे स्वप्न पाहिलेल्या संगीताने माळेगाव येथील अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. अॅकॅडमीचे प्रशिक्षक लक्ष्मण भोसले यांनी तिच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण कालावधीच्या एका महिन्यातच संगीताचे वडील राजेंद्र यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. या दु:खातून सावरत संगीताने आई-वडिलांचे आपल्याला पोलीस बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. याकाळात घरदार चालविण्याची जबाबदारी आई बारकाबाई, लहान भाऊ परमेश्वर आणि मोठी बहीण सारिका यांनी उचलली. त्यामुळे संगीतालाही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ मिळाले.
सोमेश्वर देवस्थान येथे येणा:या भाविकांना गंध लावणो, येथील व्यापा:यांकडे पेढे तयार करणो, तसेच प्रसंगी भिक्षा मागून संगीताच्या आई-वडिलांनी घर चालविले. मात्र, मुलांना शिकवण्याचे स्वप्न संगीताच्या आई-वडिलांनी कायमच उराशी बाळगले होते. ते आज पूर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षण पूर्ण करत असताना येणा:या अडचणीच्या काळात सोमेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने संगीतास सहकार्य केले.
पारधी समाजाचे जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका काढण्यासाठी रूपचंद शेंडकर यांनी मदत केली. दहावीमध्ये संगीताने 65 टक्के गुण मिळवले, तर बारावीमध्ये 58 टक्के गुण मिळवले. तसेच 11 वी 12 वीचे शिक्षण मु. सा. काकडे विद्यालय सोमेश्वर येथे पूर्ण केले.
संगीताला पोलीस भरतीसाठी प्रा. लक्ष्मण भोसले, रूपचंद शेंडकर, रमेश भांडवलकर, मोहन भांडवलकर, सोमनाथ भांडवलकर, जॉकी भोसले, कैलास गायकवाड यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
4या वेळी संगीताने सांगितले, की मुळात आमच्या समाजामध्ये शिक्षणाबाबत कमालीची उदासीनता आहे. त्यात मी मुलगी असल्याने अनेक अडचणी आल्या. परंतु, आई-वडिलांनी मला शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन दिले. घर चालविण्यासाठी आई-वडिलांना मोलमजुरी करावी लागत होती. मात्र, माङया शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पोलीस दलात चांगले काम करून समाजाची मान अभिमानाने उंचावणार असल्याचे तिने या वेळी सांगितले. तसेच खात्यांर्तगत विविध पदाच्या परीक्षा देऊन अधिकारी होणो आणि लहान भाऊ परमेश्वर यालाही पोलीस बनविण्याचा मनोदय संगीताने या वेळी व्यक्त केला.