पोलिस पाटलाच्या मुलाकडून गुटखा विक्री पोलीस पाटील निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:12 IST2021-04-09T04:12:13+5:302021-04-09T04:12:13+5:30
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या वतीने केलेल्या कारवाईमध्ये गणेश शिवाजी लोंढे (वय ३६ रा.पारगाव तर्फे अवसरी ...

पोलिस पाटलाच्या मुलाकडून गुटखा विक्री पोलीस पाटील निलंबीत
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या वतीने केलेल्या कारवाईमध्ये गणेश शिवाजी लोंढे (वय ३६ रा.पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक) याच्याकडे १८ फेब्रुवारी रोजी १३हजार८१२ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला होता. त्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. पोलीस पाटील शिवाजी लोंढे यांच्या मालकीच्या जागेमध्ये मुलगा आरोपी गणेश लोंढे हा अवैधरित्या अनधिकृतपणे गुटखा विक्री करत असल्याचे निदर्शनास आले होते. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक पारगाव शिंगवे रस्त्यावर संगम हार्डवेअर या ठिकाणी चोरून गुटखा विक्री होत होती. घरगुती कारणास्तव पोलीस पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा जबाब नोंदवला आहे. अवैद्य गुटखा विक्री प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस पाटील लोंढे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियमाच्या तरतुदींनुसार कर्तव्य पार पाडण्यात कसूर करून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्याने उपविभागीय दंडाधिकारी सारंग कोडलकर यांनी पोलीस पाटील शिवाजी लोंढे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.