शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने त्याला १०वीच्या परीक्षेत मिळाले ९८ टक्के मार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:12 IST

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कुटुंबाची त्रासापासून मुक्तता तर झालीच शिवाय त्यांच्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के मार्क मिळाले. 

पुणे: परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यासह दडपण असते पालकांवर..पाल्याच्या आरोग्यापासून ते अभ्यासाला पोषक वातावरणासाठी ते सर्वतोपरी प्रयत्नशील असतात.काही दिवसांपूर्वी मुलाच्या दहावीच्या अभ्यासामुळे सहकारनगर येथे राहायला आलेल्या पालकांसह व त्यांच्या मुलाला तेथील नागरिक व टवाळखोरांकडून त्रास होऊ लागला. त्यांनी सर्व ठिकाणी या त्रासाची तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण कुठेही त्यांच्या तक्रारीला न्याय मिळत नव्ह्ता. शेवटी त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर कुटुंबाची होणाऱ्या त्रासापासून मुक्तता तर झालीच शिवाय त्यांच्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के मार्क मिळाले. स्वाती अशोक खुंटवड मुलाची आय.सी.एस.सी.बोर्डाची इयत्ता १०वी ची परीक्षा असल्याने काळजी घेत होते. परंतु,त्यांच्या सोसायटीच्या बाजूला बाहेरील बाजूला बसविण्यात आलेल्या बेंचवर ज्येष्ठ नागरिक, बाहेरील लोक किंवा टवाळखोर मुले यांच्याकडून गप्पा, टवाळखोरी, अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ यांचा खूप त्रास होऊ लागला. या त्रासाची कुटुंबासमवेत अनेक ठिकाणी तक्रार नोंदवून देखील काही परिणाम झाला नाही..त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्याकडे तक्रार दिल्यावर त्यांनी तुम्ही निर्धास्त राहा येथून पुढे तुम्हांला कोणताही त्रास होणार नाही , तसेच परत तक्रार करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास खुंटवड कुटुंबाला दिला. त्याच दिवशी सायंकाळी दैनंदिन गस्ती दरम्यान रामचंद्र कृपा अपार्टमेंट,सहकारनगरच्या बाहेर असणा?्या पुणे महानगर पालिकेचे बेंच काढून टाकले. नुकत्याच लागलेल्या निकालात आय.सी.एस.सी.बोर्डात ९८ टक्के मार्क पडून उत्तीर्ण झाला आहे. त्या कुटुंबांनी स्वत: येऊन आज मुलगा पास झाल्याचे पेढे आणून दिले. घेवारे यांनी पण अवधूतला स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक व मूर्ती भेट देऊन स्वामीजी प्रमाणे बुद्धिमान हो व तुझ्या बुद्धीचा संपूर्ण भारत देशाला उपयोग होवो अशा शुभेच्छा दिल्या. ......

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरPoliceपोलिसStudentविद्यार्थी