ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस हेल्पलाईन
By Admin | Updated: September 20, 2015 00:35 IST2015-09-20T00:35:36+5:302015-09-20T00:35:36+5:30
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलीस संवेदनशील आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस हेल्पलाईन
पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलीस संवेदनशील आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिक संघांसोबत संवाद सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांबाबत पोलिसांना आस्था निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू करण्यात
आलेले आहेत. गेल्या पाच वर्षात २४ ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. यातील २१ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले असून आरोपींना वेळोवेळी अटकही करण्यात आलेली आहे. यातील तीन गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या हत्यांच्या तसेच शहरातील तपासावर प्रलंबित असलेल्या खुनांचा नव्याने तपास करण्याच्या सुचनाही पोलिसांना दिल्याचे पोलीस आयुक्त पाठक म्हणाले. यावेळी सह आयुक्त सुनिल रामानंद, अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील उपस्थित होते.