थर्टी फर्स्ट बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज

By Admin | Updated: December 25, 2015 01:44 IST2015-12-25T01:44:20+5:302015-12-25T01:44:20+5:30

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. आतापासून हॉटेलांमध्ये पार्ट्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

Police get ready for Thirty First | थर्टी फर्स्ट बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज

थर्टी फर्स्ट बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज

पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. आतापासून हॉटेलांमध्ये पार्ट्यांचे नियोजन करण्यात येत आहे. या थर्डी फर्स्टच्या धुमधडक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी. यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मद्यपी आणि अती उत्साही होऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे.
शहरातील सर्व हॉटेल, रिसोर्टचालकांकडून पार्ट्यांच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरु आहे. काही हॉटेल्स मालकांकडून तरुणाईचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी डीजे, नृत्यविष्कार, गझल गायनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन होत असल्याचे गैर प्रकार घडण्याची शक्यता असते. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठी असते. अपघाताला निमंत्रण दिले जाऊ शकते, हे लक्षात घेऊन पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहेत. मद्यपी वाहनचालकांची तपासणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police get ready for Thirty First