लूटमार रोखण्यात पोलीस अपयशी
By Admin | Updated: June 22, 2014 00:08 IST2014-06-22T00:08:05+5:302014-06-22T00:08:05+5:30
द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर मावळ परिसरात मागील काही वर्षापासून सुरू असलेले लुटमारीचे सत्र थांबविण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे.

लूटमार रोखण्यात पोलीस अपयशी
>लोणावळा : द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर मावळ परिसरात मागील काही वर्षापासून सुरू असलेले लुटमारीचे सत्र थांबविण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. मागील आठवडय़ात कामशेत हद्दीत घडलेल्या लुटमारीच्या दोन घटनांवरून पुन्हा अधोरेखित झाले आह़े
वास्तविक पाहता राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गावर वाहने अडवून लुटणो, ही आजची घटना नाही, तर मागील अनेक वर्षापासून हे सत्र सुरूच आह़े पोलीस प्रशासनाकडून काही कडक पावले उचलली गेली की काही काळ लुटमारीचे सत्र थांबते व काही दिवसांनी पुन्हा सुरू होते. मात्र अद्याप तरी लुटमार थांबविणो पोलीस प्रशासनाला शक्य झालेले नाही़ राष्ट्रीय महामार्गावर अनेक वर्षापासून व द्रुतगती महामार्गावर 2क्क्2 पासून वाहने अडवून प्रवाशांना मारहाण करून पैसे व मौल्यवान ऐवज लंपास करणो या घटना घडत आहेत़
ढाबे, फु डमॉल व हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या वाहनांमधील प्रवाशांच्या बॅगा पळविणो, द्रुतगती महामार्गावर दगडी तसेच खडी टाकून वाहने थांबताच लुटणो असे प्रकार सर्रास घडतात. महामार्ग पोलीस व पुणो ग्रामीण पोलीस यांच्यात रात्रगस्तबाबत असलेली उदासीनता व अनियमितता, द्रुतगती महामार्गावर सुरक्षेचे काम पाहणारी डेल्टा फ ोर्स सव्र्हिस यांची गस्त यामध्ये ताळमेळ नसल्याने सुरक्षा यंत्रणा सज्ज असताना लुटमारीचे सत्र तेजीत सुरू असल्याने या मार्गावरून प्रवास करणा:यांमध्ये भीती आह़े (वार्ताहर)
4द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावर मावळ परिसरात खंडाळा, मळवली, पवनानगर, वडगाव आदी ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आल्या आहेत़ यापैकी काही मदतकेंद्राची अवस्था अत्यंत दयनीय असून, पवना मदतकेंद्र व मळवली केंद्राची दुपारच्या सत्रत पाहणी केली असता तेथे पोलीस कर्मचारी सोडाच बाहेरील नागरिक सर्रासपणो पत्ते खेळत असल्याचे चित्र होते. तर अन्य ठिकाणचे कर्मचारी पेट्रोलिंग सोडून वाहतूक नियमांच्या नावाखाली गाडय़ा अडविण्यात धन्यता मानत असल्याचे निदर्शनास आले आह़े
कमीत कमी वेळेत मुंबई-पुणो हा प्रवास व्हावा, यासाठी नागरिक द्रुतगती महामार्गाचा अवलंब करतात. त्यासाठी टोलही देतात, मात्र तरीही प्रवास सुरक्षित होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे तसेच संतापाचे वातावरण आह़े महामार्गावर लूटमार करणारे गुन्हेगार कोठून येतात, कोठे जातात, लुटलेल्या मालाचे काय करतात, याबाबत पोलीस प्रशासनाकडे कसलीही ठोस माहिती नसल्याने महामार्गाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आह़े