त्या तिघांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: December 25, 2014 23:18 IST2014-12-25T23:18:40+5:302014-12-25T23:18:40+5:30

खेड तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना

Police detain the three | त्या तिघांना पोलीस कोठडी

त्या तिघांना पोलीस कोठडी

चाकण: खेड तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना आज खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस (दि. २७ डिसेंबरपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चार मद्यधुंद तरुणांनी जाधव यांच्यावर मंगळवारी (दि.२३) जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी बाळासाहेब महादू शिंदे ( वय ३४), दिलीप नामदेव शेवकरी (वय ४४), राजेंद्र बाळशीराम घाडगे (वय ३६, सर्वजन रा. चाकण) या तिघांना अटक करण्यात आली होती.

Web Title: Police detain the three