कॅबवरील कारवाईस पोलीस सहकार्य करणार
By Admin | Updated: January 1, 2015 01:05 IST2015-01-01T01:05:20+5:302015-01-01T01:05:20+5:30
रेडिओ कॅब करीत असलेल्या शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी परिवहन कार्यालयाने पुढाकार घ्यावा. त्यांना वाहतूक पोलीस सहकार्य करतील,

कॅबवरील कारवाईस पोलीस सहकार्य करणार
पुणे : रेडिओ कॅब करीत असलेल्या शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी परिवहन कार्यालयाने पुढाकार घ्यावा. त्यांना वाहतूक पोलीस सहकार्य करतील, असे आश्वासन वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिल्याची माहिती रिक्षा पंचायतचे नितीन पवार यांनी दिली.
पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी आवाड व प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सिद्धार्थ चव्हाण, मधुकर भुजबळ, युवराज वाढवणे व बापू कांबळे यांचा समावेश होता. कॅबला ज्यांनी परवाना दिला, त्या परिवहन कार्यालयाने कारवाईसाठीही पुढाकार घ्यायला हवा. दैनंदिन वाहतूक व्यवस्थापन व नियंत्रणाचे मोठे काम वाहतूक पोलिसांकडे आहे. त्यातून कॅबची नियमानुसार वा नियमबाह्य अशी पडताळी करणारी मोहीम राबविणे प्राप्तपरिस्थितीत शक्य नाही, असे आवाड म्हणाल्याचे पवार यांनी सांगितले.
पूर्व करार केला असल्यासच ही वाहने प्रवासी वाहतूक करू शकतात. याबाबत परिवहन कार्यालय मोठ्या प्रमाणावर कारवाई करत असून, यापुढेही ही कारवाई सुरू राहील, असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. (प्रतिनिधी)
४रेडिओ कॅबवरील प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात पोलीसांकडून दिरंगाई होत असल्याचे संघटनेचे मत
४कॅबला परवानगी देणाऱ्या आरटीओनेही यामध्ये लक्ष घालण्याची संघटनांची वाढती मागणी आहे.