शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रिक्षाच्या हुडवरुन पोलिसांनी काढला आरोपींचा माग; चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना होते लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 11:58 IST

प्रवाशांना लुबाडणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी केली अटक

पुणे : शेअर रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनीअटक केली. प्रवाशांना लुटणाऱ्या या रिक्षाचा शोध घेत असताना त्या रिक्षाचे हुड हे पांढऱ्या रंगाचे व त्यावर पाठीमागे उंची वाढवा अशी जाहिरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या धाग्यावरुन पोलीस संशयितांपर्यंत पोहचले.सद्दाम मुस्तफा बिद्री (वय २७, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी), समीर मुस्तफा शेख (वय २६, रा. पर्वती दर्शन) आणि समीर बाबुलाल बागवान (वय ३७, रा़ पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.     याप्रकरणी संतोष बंडगर (वय २०, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार गेल्या रविवारी २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्वारगेट ते पर्वती दरम्यान घडला होता. संतोष बंडगर हा मुळचा सांगोला येथील असून तो पुण्यात ए सी रिपेअरिंगची कामे करतो. गणेशोत्सवात तो गावाला गेला होता. २० सप्टेंबरला तो गावाहून परत आला. घरी जाण्यासाठी स्वारगेट आऊटगेटला रिक्षात बसला. रिक्षात अगोदरच दोघे जण बसले होते़. कात्रजला जात असताना चालकाने रिक्षा राजमाता हॉस्पिटलच्या बोळात घातली. त्यानंतर पाठीमागे बसलेल्या प्रवाशाने संतोषचा हात पकडून ठेवला. रिक्षाचालकाने त्याच्या पोटाला चाकून लावून धमकावले व तिसऱ्याने त्याच्या खिशातील २ हजार रुपये, १३ हजार रुपयांचा मोबाईल काढून घेऊन त्याला रस्त्यावर सोडून ते पळून गेले होते. घाबरल्याने त्याने हा प्रकार कोणाला सांगितला नाही़. मित्रांनी मोबाईलबद्दल विचारणा केल्यावर त्यांनी झालेला प्रकार मित्रांना सांगितले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे फिर्याद दिली.

यावेळी त्याने रिक्षाचे हुड पांढरे होते व पाठीमागे उंची वाढवा अशी जाहिरात असल्याची माहिती दिली होती. या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार सज्जाद शेख, विजय खोमणे, सचिन दळवी, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, शंकर गायकवाड यांनी रिक्षाचालकांकडून माहिती काढली. त्यात बिद्री आणि समीर शेख यांची नावे समोर आली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी आपल्यासमवेत बागवान असल्याचे सांगितले़ तिघांना अटक करुन पोलिसांनी रिक्षा, मोबाईल, रोख रक्कम व चाकून जप्त केला आहे.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसArrestअटक