लैंगिक अत्याचार करणाऱ्यास पोलीस कोठडी

By Admin | Updated: April 26, 2017 04:04 IST2017-04-26T04:04:46+5:302017-04-26T04:04:46+5:30

अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली असून,

Police cell to the victim of sexual abuse | लैंगिक अत्याचार करणाऱ्यास पोलीस कोठडी

लैंगिक अत्याचार करणाऱ्यास पोलीस कोठडी

पुणे : अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश प्रकाश आढाव (वय २४, रा. मार्केट यार्र्ड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १६ एप्रिलला कात्रज परिसरात घडली.
आरोपी पीडित मुलीला बाजारातून सामान आणायला घेऊन गेला. मित्राला भेटायच्या बहाण्याने त्याने तिला लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याने यापूर्वीही आपल्या पत्नीला माहेरी पाठवून अन्य एका अल्पवयीन मुलीवर स्वत:च्या घरात लैंगिक अत्याचार केले आहेत. त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने पीडित मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले आहेत. त्याबाबतचा तपास, गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त करण्यासाठी, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.

Web Title: Police cell to the victim of sexual abuse