पोलिसाची आयटी कंपनीतील तरुणाला भररस्त्यात मारहाण
By Admin | Updated: June 6, 2017 12:10 IST2017-06-06T12:10:27+5:302017-06-06T12:10:27+5:30
भर रस्स्त्यात आयटी कंपनीमधील तरुणाची पोलीस उपनिरीक्षकाने धुलाई केली. सकाळी 10 वाजता पुणे विद्यापीठ चौकात हा प्रकार घडला

पोलिसाची आयटी कंपनीतील तरुणाला भररस्त्यात मारहाण
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6- भर रस्स्त्यात आयटी कंपनीमधील तरुणाची पोलीस उपनिरीक्षकाने धुलाई केली. सकाळी 10 वाजता पुणे विद्यापीठ चौकात हा प्रकार घडला. मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव सिद्धनाथ बाबर असे आहे.
कार्यालय गाठण्यासाठी तरुण आणि तरुणी दुचाकीवरून रस्त्याच्या उलट्या दिशेने येत असताना त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने तरुण पोलिसांच्या अंगावर धावून गेल्यानं या पोलीस उपनिरीक्षकाने त्याला बेदम मारहाण केली.