शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर : रिंगरोड प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:26 IST

या घटनेत पोलिसांनी बावीस जणांना अटक...

राजगुरुनगर : रिंगरोड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी तसेच त्यांच्या पत्नी व खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी यांच्यासह शेतकऱ्यांनी रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात अभूतपूर्व आक्रमक आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला तर गवारी दांपत्यांना पोलिसांनी कार्यालयातून अक्षरशः फरफटत ओढून नेऊन पिंजरा गाडीत बसवले. या घटनेत पोलिसांनी बावीस जणांना अटक केली.

पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी खेड तालुक्यातील संभाव्य बाधित नऊ गावातील शेतकऱ्यांनी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. ८) सुमारे दोन तास आक्रमक आंदोलन केले. जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपातून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी थेट लाठीचार्ज केला. तसेच आंदोलकांना अटक करून गुन्हा दाखल केला.

आंदोलनादरम्यान रिंगरोड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी तसेच त्यांच्या पत्नी व खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी यांना पोलिसांनी फरफटत ओढुन नेऊन पिंजरा गाडीत बसवले. त्यांच्या बरोबर जे शेतकरी हाताला लागतील अशा जवळपास शंभर कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी अटक केली. त्यात महिलांची संख्या मोठी होती. तब्बल दोन तास आंदोलक शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून हा प्रकल्प रद्द करण्याची आक्रमक मागणी केली.

त्यावर प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी समर्पक उत्तर देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शेतकरी घोषणा देत कोणाचेही म्हणणे ऐकून घेत नव्हते. अखेर पोलिसांनी अटक करून सर्वांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. असे केल्यावर महिलांनी पोलिसांना अडवले, यावेळी कार्यालयात घोषणाबाजी आणि आरडाओरडा यामुळे गोंधळ निर्माण झाला.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव, उपनिरीक्षक राहुल लाड पोलिस हवालदार संतोष घोलप, संदिप भापकर यांच्यासह मोजका पोलीस फौजफाटा प्रयत्न करीत होते. पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर तासाभराने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथक पाचारण करण्यात आले. त्यानंतर थेट आंदोलकांना उचलुन गाड्यांमध्ये बसवणे आणि जे ऐकणार नाहीत अशांवर लाठीमार सुरू केला. काहीच वेळात सर्व  आंदोलकांना बाहेर काढून अटक करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडkhed policeखेड पोलीस