उंड्रीचा भाई म्हणवून घेणाऱ्यास पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:24+5:302021-07-25T04:11:24+5:30

पुणे : मी उंड्रीचा भाई आहे. मला भाई म्हणायचे, असे म्हणून मिठाई विक्रेत्याला धमकावून तोडफोड करणाऱ्या या कथित भाईला ...

Police beat up Undri's brother | उंड्रीचा भाई म्हणवून घेणाऱ्यास पोलिसांचा दणका

उंड्रीचा भाई म्हणवून घेणाऱ्यास पोलिसांचा दणका

Next

पुणे : मी उंड्रीचा भाई आहे. मला भाई म्हणायचे, असे म्हणून मिठाई विक्रेत्याला धमकावून तोडफोड करणाऱ्या या कथित भाईला कोंढवा पोलिसांनी चांगलाच दणका दिला.

विकास किसन लोहार (वय २३, रा. लाइफ पार्क सोसायटी, महंमदवाडी, हडपसर) असे या स्वत:ला भाई म्हणून घेणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी मिठाई विक्रेते नारायण देवासी (वय ४८, रा. उंड्री) यांना कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवासी यांचे उंड्री भागात ममता स्वीट्स मिठाई विक्रीचे दुकान आहे. लोहार गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मिठाई विक्री दुकानात शिरला. ‘या भागातील मी दादा आहे. मला ओळखत नाही का’, असे सांगून त्याने देवासी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकानाच्या काचेवर दगड मारून लोहारने तोडफोड करून ५० हजार रुपयांचे नुकसान केले. देवासी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध महिला अत्याचाराचा एक गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे तपास करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Police beat up Undri's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app