शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत सुरक्षा रक्षकांना पोलिसांची मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:32 IST

सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राची मागणी केली. त्यावरून राग येऊन पोलीसाने त्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली.

ठळक मुद्देवरिष्ठांच्या मध्यस्थीने पाडला पडदासुरक्षा रक्षकांमध्ये याबद्धल तीव्र नाराजीची भावना

पुणे: महापालिकेत नियुक्त पोलिसांनी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. चार सुरक्षा रक्षकांना पोलीस चौकीत नेण्यात आले होते, मात्र त्यानंतर वरिष्ठांच्या मध्यस्थीने याविषयावर पडदा टाकण्यात आला. मात्र सुरक्षा रक्षकांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून अशी मारहाण एखाद्या अधिकाऱ्याला झाली असती तर असेच मिटवण्यात आले असते का अशी विचारणा होत आहे. महापालिकेची सर्व प्रवेशद्वारे बंद करून आता एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. तिथे नाव,पत्ता नोंद करून व गेट पास घेऊनच आत यावे लागते. महापालिका इमारतीच्या सुरक्षेवरून गेल्या अनेक महिन्यांपासून ही व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी साध्या वेशातील एक पोलीस शिपाई कसलीही नोंद न करता आतमध्ये येत होते. त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकाने विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण पोलीस आहोत असे सांगितले. त्यावर सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राची मागणी केली. त्यावरून राग येऊन त्यांनी त्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली. सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राचा आग्रह कायम ठेवल्याने पोलीस शिपाई यांनी महापालिका मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात याची माहिती दिली. त्यांचे वरिष्ठ अधिकारी तिथे आले व त्यांनीही सुरक्षा रक्षकांना आमच्या माणसांना ओळखपत्र मागता का म्हणून झापले. एवढेच नाही तर यांना चौकीत घेऊन चला असे सांगत तीन सुरक्षा रक्षकांना पोलीस चौकीत नेले. त्यांना तिथेही मारहाण केली असल्याचे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्य सुरक्षा रक्षक लगेचच काम थांबवून तिथे आले. त्यांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली व तीन सुरक्षा रक्षकांना चौकीत नेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तिथे आले. त्यांनी चौकीत जाऊन प्रकरण मिटवले. सुरक्षा रक्षकांनाही परत आणण्यात आले. फिर्याद करणे वगैरे बाजूलाच राहिले, उलट सुरक्षा रक्षकांनाच कोणालाही कसे ओळखपत्र मागता म्हणून झापण्यात आले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये याबद्धल तीव्र नाराजीची भावना आहे. एखाद्या अधिकाऱ्याला अशी मारहाण झाली असती तर प्रकरण असेच मिटवण्यात आले असते का अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. ...............बहुतेक सुरक्षा रक्षक ठेकेदार कंपनीकडून घेतलेले आहेत. अत्यंत कमी वेतनावर ते काम करत असतात. त्यांना कसल्याही सुविधा नाहीत. नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, नागरिक यांच्याकडून त्यांना सतत बोलणी खावी लागतात. नगरसेवकांबरोबर रोज अनेक कार्यकर्ते वाहन घेऊन येतात व कुठेही कसेही लावतात. सुरक्षा रक्षक काही बोलले तर त्यांच्याशी हुज्जत घालतात. अशा प्रकारांमध्ये वाढ होत असून त्यात प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.   

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस