शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसांनी कामावर जाणाऱ्या पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 13:41 IST

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला नाकाबंदीवर असणाऱ्या पाेलिसांनी मारहाण केल्याचे समाेर आले आहे.

पुणे : लाॅकडाऊन घाेषित झाल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पाेलिसांनी चाेप दिला हाेता. त्यावर टीका झाल्यानंतर ही कारवाई साैम्य करण्यात आली हाेती. आज सकाळी महापालिकेत निघालेल्या कर्मचाऱ्याला पाेलिसांनी लाठीने मारहाण केल्याचा प्रकार समाेर आला आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याच्या गळ्यात पालिकेचे ओळखपत्र असतानाही ही मारहाण करण्यात आल्याचा आराेप कर्मचाऱ्याकडून करण्यात आला आहे. 

लाॅकडाऊननंतर सर्वच व्यवहार तसेच ऑफिसेस बंद करण्यात आली आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून साेडण्यात येत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये पाच टक्के कर्मचाऱ्यांवर काम करण्यात येत आहे. आज सकाळी पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक रमेश ठाकूर हे कामावर येत असताना ज्ञानेश्वर पादुका चाैकामध्ये कामावर असणाऱ्या पाेलिसांनी त्यांना मारहाण केली. ठाकूर यांच्या गळ्यात महापालिकेचे ओळखपत्र असतानाही पाेलिसांनी त्यांना मारहाण केली. ठाकूर आपले ओळखपत्र दाखवत असताना देखील काहीही न ऐकून घेता पाेलिसांनी मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ठाकूर यांना जबर मार बसला आहे.

दरम्यान या प्रकाराची महापालिकेने गंभीर दखल घेतली असून याबाबत पालिकेकडून मुख्यमंत्री कार्यालय तसेच पुणे पाेलीस आयुक्तालयात तक्रार केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका