पोलिसाला मारहाणप्रकरणी दोघांना अटक

By Admin | Updated: October 24, 2014 05:13 IST2014-10-24T05:13:34+5:302014-10-24T05:13:34+5:30

दोन ट्रक चालकांमध्ये चाललेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली

Police arrested marahanaprakarani | पोलिसाला मारहाणप्रकरणी दोघांना अटक

पोलिसाला मारहाणप्रकरणी दोघांना अटक

पुणे : दोन ट्रक चालकांमध्ये चाललेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना २४ आॅक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
राहूल सत्यवान मासाळ (२४), विक्रम दत्तात्रय माळी (२४, दोघेही रा. मु. पो. लोणी काळभोर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक लवकेश मुनीश्वर त्रिपाठी यांनी फिर्याद दिली आहे. त्रिपाठी हे पोलिस खात्यातील वाहतूक नियंत्रण शाखेत सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर नोकरीस असून ते सध्या विमानतळ वाहतूक विभागात आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील वडगांव शेरी चौक येथे हजर असताना त्यांना चौकात दोन ट्रक चालकांची भांडणे चालू असल्याची दिसली. भांडणे सोडविण्यासाठी त्रिपाठी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. (प्रतिनिधी)

Web Title: Police arrested marahanaprakarani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.