शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणी ‘त्या’ पोलीस मित्राला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 22:55 IST

अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवून डॉक्टरांकडून ७५ लाख रुपयांची खंडणीप्रकरण

ठळक मुद्देफिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन जयेश कासट यांना अटक

पुणे : अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवून डॉक्टरांकडून ७५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्याला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या पोलीस मित्राला अखेर पोलिसांनीअटक केली. जयेश कासट (रा़ नारायण पेठ)  असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी मनोज अडसुळ यांचा भाऊ डॉ. हेमंत तुकाराम अडसुळ (वय ५५, रा. चिंतामणीनगर, सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ़ हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना जयेश कासट यांनी २ जानेवारी रोजी दुपारी फोन करुन नारायण पेठेतील निरंजन मेडिकल या ठिकाणी बोलावले़ तेथे जर आला नाही तर तुझा भाऊ मनोज प्रचंड अडचणीत येईल. सायंकाळी ते दुकानात गेल्यावर त्याने मी पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यास या ट्रस्टचा मेंबर आहे व अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. त्यानंतर ६ जानेवारीला त्याने पुन्हा धमकी दिली. तेव्हा आम्ही ५लाख रुपये रोख दिले़ तरीही त्याने डॉ़ रासने यांनी दिलेल्या ७० लाख रुपयांची मागणी करुन त्रास देण्यास सुरुवात केली.पोलीस मित्र म्हणून वावरणारे जयेश कासट हे आपल्याकडे खंडणी मागत असल्याची तक्रार मनोज अडसुळ यांनी पोलीस आयुक्तांकडे ६ फेब्रुवारी रोजी केली होती. या तक्रार अर्जाची चौकशी करीत असताना डॉ़ दीपक रासने यांनी मनोज अडसुळ यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यावरुन मनोज अडसुळ यांच्यावर ७५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मनोज अडसुळ फरारी आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर शनिवारी डॉ. हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन जयेश कासट यांना अटक केली आहे. उशीरा का होईना अडसुळ कुटुंबियांना न्याय मिळाला, असे त्यांचे वकील विजय ठोंबरे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी