शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर येथे २५ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 20:13 IST

आरोपीने तक्रारदार यास पैसे घेऊन प्रथम इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बोलावून घेतले.

ठळक मुद्देपुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई, गुन्हा दाखल पोलीस ठाण्यासमोरच घेतले ताब्यात 

इंदापूर : तक्रारदार यांच्या भावासह इतर तीन जणांवर गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्याला जामीनदार मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आरोपी राहुल बडे यांनी २५ हजारांची लाच मागितली. ती स्वीकारल्यानंतर सापळा रचलेल्या पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १५) दुपारी १.३० वाजता इंदापूर शहरातील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलजवळ तक्रारदार यांच्याकडून आरोपी राहुल दत्तात्रय बडे (वय ३०, पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर २५००, रा. बाब्रस मळा, लेन नंबर ६ तिरुपती अपार्टमेंट, इंदापूर, मूळ गाव  माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने तक्रारदार यास पैसे घेऊन प्रथम इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बोलावून घेतले. त्यांनतर त्याला स्वत:च्या बुलेट गाडीवर घेऊन इंदापूर शहराच्या आडबाजूला प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्यासमोर घेऊन गेला व त्याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारून तक्रारदाराला तेथेच सोडून इंदापूर पोलीस ठाण्याकडे निघून आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना इंदापूर पोलीस ठाण्यासमोर तपासले असता त्यांच्या बुलेट गाडीच्या डिक्कीमध्ये २५ हजारांची रक्कम आढळून आली व त्यांना जागीच चौकशीसाठी पथकाने ताब्यात घेतले व रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस निरीक्षक घार्गे, सहायक पोलीस निरीक्षक ढवणे, पोलीस नाईक कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल म्हेत्रे यांनी केली. या कारवाईसाठी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सहकार्य केले. ____________________________________________

टॅग्स :IndapurइंदापूरCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसArrestअटक