शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

महिला सुरक्षिततेबाबत पोलीस सजग

By admin | Updated: May 5, 2017 02:55 IST

आयटी अभियंता रसिला राजू ओपी, अंतरा दास या तरुणींच्या खुनाच्या घटनेनंतर हिंजवडी आयटी परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी

पिंपरी : आयटी अभियंता रसिला राजू ओपी, अंतरा दास या तरुणींच्या खुनाच्या घटनेनंतर हिंजवडी आयटी परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. संकटात सापडलेल्या मुलींना तत्काळ मदतीसाठी पोलिसांनी बडीकॉप सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर पोलीस खात्याने उपलब्ध करून दिलेली ‘प्रतिसाद अ‍ॅप’ ही सेवाही उपयोगात येऊ लागली आहे. लोकमत प्रतिनिधींनी गुरुवारी दुपारी हिंजवडी आयटी परिसरात ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. त्या वेळी अवघ्या दहा मिनिटांच्या आत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीजवळ लोकमत महिला प्रतिनिधीने दुपारी ३ वा. मोबाईलमधील प्रतिसाद अ‍ॅपचा वापर करून दुचाकीवरून आलेले काही तरुण छेडछाड करत असल्याची तक्रार नोंदवली. तीन वाजता अ‍ॅपवरून तक्रार दाखल होताच, दुसऱ्या मिनिटाला पोलिसांचा प्रतिनिधीच्या मोबाईलवर कॉल आला. ‘‘तुम्ही कोठे आहात हे नेमके ठिकाण सांगा, जवळपासची खूण सांगा, तुम्हाला मदत दिली जाईल,’’असे त्यांनी सांगितले. लोकमत प्रतिनिधीने त्यांना जवळपासची खूण सांगितली. एका बांधकाम प्रकल्पाचे साईट आॅफिस आहे, त्याच्या समोर रस्त्यावर थांबल्याचे सांगितले. ठीक आहे, असे म्हणून पोलिसांनी फोन ठेवला. त्यानंतर आवघ्या आठ मिनिटांत पोलिसांची व्हॅन त्या ठिकाणी हजर झाली. पोलीस ठाण्यातून पुन्हा फोन आला. व्हॅन पोहोचली का ? अशी त्यांनी चौकशी केली. पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन बर्डे, गस्तीवरील पोलीस कर्मचारी जब्बार सय्यद, कमांडो विजय भिसे, अनिल पानसकर त्या व्हॅनमधून खाली उतरले. त्यांनी लोकमत महिला प्रतिनिधी आणि अन्य एका तरुणीकडे चौकशी केली. तुम्हाला त्रास देणारे दुचाकीवरील तरुण कोठे गेले? दुचाकीचा क्रमांक तुम्ही सांगू शकता का? कोणत्या दिशेने ते तरुण निघून गेले, अशी विचारणा त्यांनी केली. अडीच किलोमीटर अंतर तरीही पोलीस वेळेवर प्रतिसाद अ‍ॅपवरून तक्रार नोंदविल्यानंतर लोकमतच्या महिला प्रतिनिधी , तसेच एसएनबीपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी या दोघी इन्फोसिस कंपनीजवळ रस्त्यावर थांबल्या. त्यांनी मोबाईल अ‍ॅपवरून तरुण छेडछाड करीत असल्याची तक्रार नोंदविली. हिंजवडी पोलीस ठाणे ते इन्फोसिस फेज टू हे अंतर दोन ते अडीच किलोमीटरपेक्षा अधिक आहे. पोलीस ठाणे ते हे अंतर कापण्यासाठी पोलिसांना वेळ लागेल. तातडीने पोलीस येऊ शकतील का? अशी शंका त्यांच्या मनात आली असतानाच, काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे आश्चर्यकारक वाटले. रजेवर असूनही कर्तव्य बजावलेस्टिंग आॅपरेशनसाठी गेलेल्या लोकमत महिला प्रतिनिधींना प्रतिसाद अ‍ॅपवरील तक्रारीनंतर पोलिसांचे कॉल आले. तुमच्या मदतीसाठी पोलीस पाठवले आहेत, ते पाहोचले का, अशी आस्थेने विचारणा झाली. पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली. पोलीस वेळीच दाखल झाले. एवढे झाल्यानंतरही पुढे एक तास वरिष्ठ पोलीस अधिकारी याबद्दल चौकशी करीत होते. ज्यांनी तक्रार नोंदवली त्या तरुणींना मदत मिळाली का, याची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी फोन करीत होते. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पवार हे रजेवर होते. रजेवर असूनही त्यांनी या घटनेबाबत तत्परता दाखवली. त्यांनी लोकमत प्रतिनिधीला वारंवार फोन करून तक्रारीची माहिती घेतली. पोलिसांची व्हॅन येऊन गेल्यानंतर एक तासाने पुन्हा पोलीस अधिकारी सीताराम शिंदे यांनी तुम्हाला आमची मदत मिळाली का, याची चौकशी करण्यासाठी फोन केला. लोकमत प्रतिनिधींना पोलिसांची तत्परता जाणवली. ‘अ‍ॅप’बद्दल महिला अनभिज्ञ पोलिसांनी प्रतिसाद अ‍ॅप सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संकटात सापडलेल्या महिलांना तातडीने पोलिसांकडून मदत मिळावी, या उद्देशाने पोलीस खात्याने प्रतिसाद अ‍ॅप सुरू केले. मात्र, महिला आणि तरुणी या अ‍ॅपबद्दल अनभिज्ञ आहेत. जनजागृती नसल्याने असे काही अ‍ॅप आहे, हे महिलांना माहीत नाही. नोकरदार महिला वर्ग तसेच महाविद्यालयीन तरुणी यांना मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करून देण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबवले गेले पाहिजेत, असे महिलावर्गाचे म्हणणे आहे. आयटी सुरक्षेसाठी ‘बडीकॉप’ सुविधातळवडेत आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीचा खून झाला. पाठोपाठ हिंजवडी आयटी पार्कमध्ये रसिला राजू ओपी या अभियंता तरुणीच्या खुनाची घटना घडली. त्यांनतर पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गंभीर दखल घेऊन महिला सुरक्षितता जनजागृती अभियान राबविले. एवढेच नव्हे तर वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन करून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण, तरुणींशी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणींशी संवाद साधून सुरक्षिततेची दक्षता कशी घ्यावी, याबद्दल सूचना केल्या. कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंपन्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दलच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर ‘बडी कॉप’ सुविधा खास या परिसरासाठी सुरू केली. पोलीस आयुक्तांनी उपाययोजनांकडे जातीने लक्ष दिले असल्यामुळे परिसरातील यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे हिंजवडीतील पोलिसांची तत्परता दिसून येऊ लागली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बडिकॉप मोहिमेअंतर्गत महिलांचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. असे आणखी ग्रुप तयार केले जात आहेत. या ग्रुपमध्ये महिला पोलीस अधिकारी तसेच बडीकॉपसाठी काम करणारे पोलीस अधिकारी यांचाही सहभाग घेण्यात येत आहे. महिलांना त्रास देण्याचा काही प्रकार घडल्यास बडीकॉपच्या माध्यमातुन त्याची दखल घेतली जाते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पुढाकाराने यासंदर्भात आयटी कंपन्यांमधील तरूणींकरिता मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित केले जात आहेत.