शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

४५१ बिटकॉईन हस्तगत करण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 02:11 IST

बिटकॉईन प्रकरण : १० आरोपींवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल

पुणे : बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक केल्याप्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांनी ६४ लाख रुपयांचे ४५१ बिटकॉईन हस्तगत करण्यात यश आले आहे़ आतापर्यंत १० आरोपींना अटक केली असून, शिवाजीनगर न्यायालयात सायबर सेलने त्यांच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले़

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात सायबर गुन्हे शाखेने अटक केलेल्या एका आरोपीच्या बिटकॉईन कॅश वॅलेटमधून ६४ लाख रुपये किमतीच्या ४५१ बिटकॉईन जप्त केल्या आहेत.अमित भारद्वाज याने सिंगापूरमध्ये एप्रिल २०१४ मध्ये गेन बिटकॉईन (जीबी २१) या कंपनीच्या माध्यमातून क्लाऊड मायनिंग करून बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास चार महिन्यांत २०० टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवले.

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने भारद्वाज व त्याच्या साथीदारांविरुद्ध राज्यातील पहिला गुन्हा पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यापाठोपाठ निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. निशा चंदन रायसोनी (वय ४६, रा. पुणे-सातारा रस्ता) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर राज्यात पुण्यातील दत्तवाडी व निगडी व राज्यातील नांदेड येथे गुन्हा केला. त्यानंतर अमित भारद्वाज याच्यासह दहा जणांना सायबर गुन्हे शाखेने अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. साहील ओमप्रकाश बागला याच्याकडून हस्तगत केलेल्या डिजिटल साहित्याचे फॉरेन्सिक अ‍ॅनालिसीस केल्यावर ४५१़९९९ इतक्या बिटकॉईन त्याच्या कॅश वॅलेटमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या बिटकॉईन कॅश वॅलेट अ‍ॅड्रेसमधून फॉरेन्सिक आॅडिटरच्या मदतीने ६४ लाख रुपये किमतीच्या बिटकॉईन जप्त केल्या आहेत.हाँगकॉँग, दुबईत पैसे गुंतवले१ सायबर सेलने अमित भारद्वाज व इतरांना ४ हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले होते़ या ४ हजार पानी दोषारोप पत्रात त्यांनी यातून मिळविलेला पैसा कसा परदेशात गुंतविला याची माहिती दिली.२ बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून अमित भारद्वाज याने जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले असून, हॉँगकॉँगमध्येही आणि दुबईमध्येही मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़

टॅग्स :BitcoinबिटकॉइनPuneपुणे