गरोदर विवाहितेला विष पाजुन मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST2021-01-13T04:28:47+5:302021-01-13T04:28:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : गरोदर विवाहितेला लाथाबुक्यांनी मारहाण करीत न विषारी आैषध पाजण्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर ...

गरोदर विवाहितेला विष पाजुन मारले
लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : गरोदर विवाहितेला लाथाबुक्यांनी मारहाण करीत न विषारी आैषध पाजण्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात घडला. या घटनेत पिडीत महिलेसह तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचाही अंत झाला. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात ९ आरोपींविरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
साजन नितीन भोसले (वय २३) असे या घटनेत मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती नितीन मच्छिद्र भोसले, सासरा मच्छिद्र भोसले,सासू औरंगाबाद भोसले, स्वप्नील भोसले, सवत नाजुका नितीन भोसले, मामा काळू बाटल्या पवार, अनिल पांडुरंग काळे, दया अनिल काळे, पवन भोसले यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करीत तु आमचे इथे राहू नको असे म्हणून तिला खाली पाडके. तसेच मारहाण करत बळजबरीने तिला विषारी ओषध पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विषारी ओषधाचा परिणाम होत असतानाच तिला भिगवण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. भिगवण य्रेथिल दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी इंदापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पिडीतेचा मृत्यू झाला. याबाबत पिडीतेची आई संतोषी मिस्टीनग्या काळे (रा.खंडोबानगर,बावडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी या प्रकरणी आरोपी विरोधात खून आणि गर्भाचे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करूनयातील २ आरोपींना अटक केली. अटक आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.