शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

काव्य म्हणजे कवीच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब : अश्विनी धोंगडे; पुण्यात पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 12:58 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देकविता म्हणजे त्या कवीचे शब्दांतून समोर आलेले जणू काही एक रूपच : अश्विनी धोंगडेधोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान

पुणे : कवी जगत असताना त्याच्या जगण्यातून जे विचार, भावना व्यक्त होत असतात त्या तो कवितेमधून सादर करतो. कवी जोपर्यंत त्याचे स्वत:चे सत्त्व कवितेत मांडत नाही, तोपर्यंत त्याची कविता पूर्ण होत नाही. कवितेमध्ये त्या कवीचे समग्र व्यक्तिमत्त्वच प्रतिबिंबित होत असते. कविता म्हणजे त्या कवीचे शब्दांतून समोर आलेले जणू काही एक रूपच असते, असे मत साहित्यिका अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माधव हुंडेकर यांच्या ‘दायभाग’ कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. या वेळी कविता निवड समितीच्या सदस्या डॉ. वर्षा तोडमल, मीरा शिंदे, सुहासिनी यांच्या कन्या डॉ. रूपा आडगावकार, डॉ. अलका चिडगोपकर, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, बण्डा जोशी आदी उपस्थित होते.धोंगडे म्हणाल्या, ‘‘जो कवी असतो, त्याच्यावर समाजातील घटना व घडामोडींचा परिणाम होत असतो. या घटना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतो आणि तो भाग कविता म्हणून बाहेर पडतो. त्या कवितेमध्ये वैचारिक व बौद्धिकता जाणवते. त्यामुळे प्रत्येक कवीने समाजात घडणाºया घटनांचा जाणीवपूर्वक विचार करावा.’’माधव हुंडेकर म्हणाले, ‘‘मी ज्या भावनेतून कविता लिहिल्या, त्या जनांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरलो. मला अनेकांनी विचारले, की तुम्ही कविता कधी लिहिता? तर मी कविता लिहीत नाही ती एखादा आशय आणि आकृतिबंध घेऊन येते. आपल्याला आलेले अनुभव ही कवितेच्या बाबतीत श्रीमंती असते. म्हणून माझी कुठली कविता वादाला जाऊन चिकटत नाही.’’वर्षा तोडमल म्हणाल्या, ‘‘दायभाग ही कविता संग्रहाच्या रूपात सागळ्यांसमोर आली आहे. हे वेगळेपण आहे. कविता हा प्राचीन प्रकार आहे. त्यातून कुठलीही भावना व्यक्त करता येते.’’या संग्रहाची कुठलीही कविता वाचताना त्यातून कमी शब्दांचा वापर आणि उत्तम आशय दिसून येतो. तसेच कवितेमधून स्वत:चा स्वर जाणण्याची वृत्ती दिसून येते. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. बण्डा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशीSunitaraje Pawarसुनिताराजे पवारPuneपुणे