शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शासनाकडून ‘पीएमपी’ची ससेहोलपट; सततच्या बदल्यांमुळे चाके येईनात मार्गावर, प्रवाशांचे होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 05:52 IST

शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सांभाळणा-या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची राज्य शासनाकडून स्थापनेपासून ससेहोलपट करण्यात आली आहे. मागील दहा वर्षात एक अपवाद वगळता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून एकाही अधिका-याला तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेला नाही.

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सांभाळणाºया पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची राज्य शासनाकडून स्थापनेपासून ससेहोलपट करण्यात आली आहे. मागील दहा वर्षात एक अपवाद वगळता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून एकाही अधिका-याला तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेला नाही. आतापर्यंत पंधरा अधिकाºयांकडे पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली. सतत बदलणाºया अधिकाºयांमुळे ‘पीएमपी’ मार्गावर आली नाही.कोणतीही संस्था किंवा कंपनीचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी प्रमुखावर असते. प्रमुखाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिबिंब कामकाजात दिसते. त्यानुसार संस्थेची वाटचाल होते. त्यामध्ये सातत्य राहते. पण पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक बससेवा पुरविणाºया ‘पीएमपी’चे प्रमुख म्हणजे अध्यक्ष सातत्याने बदलत राहिले.‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्यासाठी पुणेकरांकडून सातत्याने पुर्णवेळ आयएएस अधिकारी देण्याची मागणी केली जाते. मात्र, काही महिन्यांपुरते अधिकाºयांची नियुक्ती करण्याची परंपरा आघाडी सरकारनंतर युती सरकारनेही कायम ठेवली. ‘पीएमपी’चे पहिले अध्यक्ष म्हणून सुब्बराव पाटील यांनी दि. २६ आॅगस्ट रोजी जबाबदारी स्वीकारली. त्यांना केवळ पंधरा महिन्यांचा काळ मिळाला. त्यांच्यानंतर आलेले अश्विनीकुमार केवळ तीन महिनेच राहिले. त्यानंतर नितीन खाडे यांना सुमारे सहा महिनांचा काळ मिळाला. खाडे यांच्यानंतर आॅगस्ट २००९ ते ३ जानेवारी २०११ या सुमारे दीड वर्षांच्या काळात महेश झगडे, शिरीष कारले आणि दिलीप बंड यांच्याकडे ‘पीएमपी’चा अतिरिक्त पदभार राहिला. केवळ आर. एन. जोशी (दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४) यांनीच तीन वर्ष पीएमपीचा गाडा हाकला. त्यानंतर पुन्हा जून २०१५ पर्यंत आठ महिने श्रीकर परदेशी, ओमप्रकाश बकोरिया आणि कुणाल कुमार यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. अभिषेक कृष्णा यांच्या रुपाने पुन्हा जून २०१५ मध्ये पीएमपीला पुर्णवेळ अधिकारी मिळाला. पण तेही केवळ वर्षभरच राहिले. पुन्हा आठ महिन्यांसाठी कुणालकुमार आले. त्यानंतर आलेल्या तुकाराम मुंढे यांनाही केवळ १० महिने मिळाले. आता पीएमपीच्या पंधराव्या अध्यक्षा म्हणून नयना गुंडे यांच्या पदभार स्वीकारला आहे.श्रीकर परदेशी, तुकाराम मुंडेंनाही अल्पकाळ संधीदहा वर्षांच्या काळात बदललेल्या पंधरा अधिकाºयांपैकी ‘पीएमपी’ला केवळ सात अधिकारी पुर्णवेळ मिळाले. इतर आठही अधिकाºयांकडे ‘पीएमपी’ अतिरिक्त भार देण्यात आला होता. पुर्णवेळ अधिकाºयांमध्येही सर्वाधिक सुमारे तीन वर्ष आर.एन.जोशी राहिले. तर पाटील व कृष्णा यांनाच किमान वर्षभर काम करता आले.त्यामुळे जवळपास चार वर्ष ‘पीएमपी’चा कार्यभार ‘अतिरिक्त’ अधिकाºयांच्या खांद्यावर राहिला. अधिकारी बदलतगेले, मात्र पीएमपीची स्थिती जैसे थे राहिली. परदेशी, मुंढे यांनी विविधसुधारणा करण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, शासनाने त्यांनाही फार काळ संधी दिली नाही.2007मध्ये ‘पीएमपी’ अस्तित्वात आल्यापासून ते आजअखेरपर्यंत तब्बल १५ अधिकारी आले. त्यामुळे कंपनीच्या कामात कधीच सातत्य पाहायला मिळाले नाही. उलट सातत्याने बदलणाºया अधिकाºयांमुळे कंपनीच्या तोट्यात भरच पडत गेली. अपुºया बस, सोयी-सुविधा, प्रवाशांची घटती संख्या, अधिकारी व कर्मचाºयांची मनमानी यामुळे पीएमपी खिळखिळी झाली.२००७ पासूनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकअधिकारी कार्यकाळ१) सुब्बराव पाटील दि. २६ आॅगस्ट २००७ ते ५ नोव्हेंबर २००८२) अश्विनीकुमार दि. ५ नोव्हेंबर २००८ ते ८ फेब्रुवारी २००९३) नितीन खाडे दि. ९ फेब्रुवारी २००९ ते २४ आॅगस्ट २००९४) महेश झगडे (अतिरिक्त पदभार) दि. २५ आॅगस्ट २००९ ते ७ सप्टेंबर २००९५) शिरीष कारले (अतिरिक्त पदभार) दि. ७ सप्टेंबर २००९ ते २३ फेब्रुवारी २०१०६) दिलीप बंड (अतिरिक्त पदभार) दि. २३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११७) आर. एन. जोशी दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४८) आर. आर. जाधव (अतिरिक्त पदभार) दि. १ नोव्हेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४९) श्रीकर परदेशी (अतिरिक्त पदभार) दि. १२ डिसेंबर २०१४ ते ७ एप्रिल २०१५१०) ओमप्रकाश बकोरिया (अतिरिक्त पदभार) दि. ७ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५११) कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार) दि. ३० मे २०१५ ते ६ जून २०१५१२) अभिषेक कृष्णा दि. ८ जून २०१५ ते ८ जुलै २०१६१३) कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार) दि. ८ जुलै २०१६ ते २९ मार्च २०१७१४) तुकाराम मुंढे दि. २९ मार्च २०१७ ते ८ फेबु्रवारी २०१८१५) नयना गुंडे दि. १२ फेब्रुवारी २०१८

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे