शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए घरकुलांची आज सोडत, १,०२९ सदनिकांसाठी ५,३१७ अर्जदार पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:57 IST

- आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार प्रक्रिया; 'म्हाडा'च्या प्रणालीद्वारे पारदर्शकता 

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहप्रकल्पातील शिल्लक १,०२९ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. बुधवारी (दि.८ एप्रिल) सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. या प्रक्रियेत ५,३१७ पात्र अर्जदारांचे भवितव्य ठरणार आहे.

पीएमआरडीएच्या गृहयोजनेसाठी एकूण ५,३६७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननीनंतर ५० अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे उर्वरित ५,३१७ अर्जदार आता या सोडत प्रक्रियेत नशीब अजमावतील.

ही सोडत प्रक्रिया 'म्हाडा'ने विकसित केलेल्या नव्या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याने प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असे 'पीएमआरडीए'च्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी स्पष्ट केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि 'पीएमआरडीए'च्या सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडणार आहे. 

सदनिका आणि पात्र अर्जदारांची स्थिती :

- पेठ क्र. १२ (आर्थिक मागास) : ८१ सदनिकांसाठी २,१८२ अर्जदार

- पेठ क्र. १२ (कमी उत्पन्न गट) : ३९३ सदनिकांसाठी १,९७५ अर्जदार

- पेठ क्र. ३०-३२ (आर्थिक मागास) : ३२७ सदनिकांसाठी ४५६ अर्जदार

- पेठ क्र. ३०-३२ (कमी उत्पन्न गट) : २२८ सदनिकांसाठी ७०४ अर्जदार 

थेट प्रक्षेपणाची सुविधा :

सोडत प्रक्रियेवेळी इच्छुक अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन 'पीएमआरडीए'ने केले आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. या प्रक्रियेची 'यूट्यूब लिंक' सर्व पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल, अशी माहिती 'पीएमआरडीए'कडून देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : PMRDA Housing Lottery: Draw on Wednesday for 1,029 Flats

Web Summary : PMRDA will hold a lottery on Wednesday for 1,029 flats across Peth 12 and 30-32. 5,317 eligible applicants will participate. The draw, using transparent technology, will be held at Gadima Rangmandir in Akurdi. Live streaming will be available for those unable to attend.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र