पीएमआरडीएला लवकरच मुहूर्त
By Admin | Updated: March 4, 2015 23:38 IST2015-03-04T23:38:52+5:302015-03-04T23:38:52+5:30
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेला लवकरच मुहूर्त सापडणार असून, नगरविकास विभागाने पीएमआरडीएची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली

पीएमआरडीएला लवकरच मुहूर्त
पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेला लवकरच मुहूर्त सापडणार असून, नगरविकास विभागाने पीएमआरडीएची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच पुण्याच्या प्रश्नांबाबत तीन महिन्यांपूर्वी विधानभवन येथे धावती बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास सांगितले होते.
हे प्राधिकरण केवळ नियोजनापुरते न ठेवता एमएमआरडीए सारखी लँड बँक किंवा हैदराबाद पॅर्टनचा विचार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने पीएमआरडीए स्थापनेसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे धूळखात पडून आहे. पुण्यासाठी पुणे महानगर समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाहतूक आणि इतर विकासकामांचे आराखडे तयार करण्याचे कामदेखील सुरू केले आहे; पंरतु या विकास आराखड्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एमएमआरडीएसारखे स्वतंत्र पीएमआरडीए स्थापन करणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव चार वर्षांपासून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता; परंतु समिती स्थापन झाल्यावर
त्याचे अध्यक्षपद कोणाकडे द्यावयाचे, यावरून काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये वाद निर्माण झाला
होता. त्यात ‘दादा’ आणि ‘बाबा’ दोघांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने सत्तेच्या काळात अखेरच्या क्षणापर्यंत हा प्रस्ताव मंजूर झाला नाही.(प्रतिनिधी)
४पीएमआरडीए स्थापन झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे,खडकी, देहूरोड कॅन्टोमेंट यांच्यावबोरबर लोणावळा, तेळगाव,शिरुर, भोर, सासवड आणि दौंड नगरपालिका यांच्या एकत्रित विकासाचे नियोजन करणे आणि अंंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.
रिंगरोडची अंमलबजावणी पीएमआरडीए करणार
४पुणे शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा रिंगरोडच्या प्रकल्पाची अंमलबजावणी सध्या नक्की कोणी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु पीएमआरडीए स्थापन झाल्यास हा प्रश्न मार्गी लागणार असून, पीएमआरडीए मार्फत रिंगरोडची अंमलबजावणी करण्यात येईल.