शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पीएमआरडीए अर्धा टीएमसीचे दोन प्रकल्प उभारणार : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:38 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. या वर्धापन दिनानिमित्त पीएमआरडीएने मागील तीन वर्षांत केलेल्या विविध कामांची बापट यांनी माहिती दिली.

ठळक मुद्देवाघोली, पिरंगुटमध्ये नियोजन; पीएमआरडीएचा तिसरा वर्धापनदिन हिंजवडी ते शिवाजीनगर या पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम वेगात सुरू

पुणे : नवीन पुण्याच्या विकासासाठी हवेली तालुक्यातील वाघोली आणि मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे प्रायोगिक तत्वावर (.५) म्हणजे प्रत्येकी अर्धा टीएमसी पाण्याचे प्रकल्प (पुनर्वापर) उभारण्यात येणार आहे. या पाण्यातून परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्या आणि इतर सोयीसुविधांसाठी या पाण्याचा उपयोग करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. या वर्धापन दिनानिमित्त पीएमआरडीएने मागील तीन वर्षांत केलेल्या विविध कामांची बापट यांनी माहिती दिली. याप्रसंगी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे तसेच वडाचीवाडीचे सरपंच दत्रात्रय बांदल आणि होळकरवाडीच्या सरपंच मंगलताई झांबरे उपस्थित होते.बापट म्हणाले, की पीएमआरडीए बाळसं धरत आहे. या तीन वर्षांत अनेक दीर्घकालीन कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी लागणारा निधी, मान्यता, नाागरिकांचे प्रश्न, त्यांची सोडवणूक यासाठी बराच कालावधी जाईल. नव्या पुण्याची विमानातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचे तसे नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक रस्ते, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, शाळा, पाणी, ड्रेनेजलाईन आदींच्या यामध्ये अंतर्भाव केला केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ते सर्व पीएमआरडीएच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत.  शिवाजीनगर येथे मेट्रो स्टेशनसाठी गोदामाच्या जागेची नुकतीच मी पाहणी केली आहे. त्याठिकाणी लवकरच जागा ताब्यात घेऊन काम सुरू करणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम वेगात सुरू आहेत. त्याचबरोबर महामेट्रोतर्फे होणाऱ्या वनाज-स्वारगेट-निगडी आणि वनाज-शिवाजीनगर-रामवाडी (चंदननगर) या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे, असेही यावेळी बापट यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएgirish bapatगिरीष बापटKiran Gitteकिरण गित्ते