शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीच्या मेट्रोला मंत्रिमंडळाकडून मंजुरी? हिंजवडी ते शिवाजीनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:31 IST

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पालिकेच्या मेट्रो प्रकल्पापाठोपाठ आता पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्पही मार्गी लागेल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे डिसेंबर महिन्यात अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २0 टक्के निधी तर उर्वरित ६0 टक्के निधी खासगी उद्योजकांच्या सहभागातून उभा केला जाईल. केंद्र शासनाच्या ‘न्यू मेट्रो पॉलिसी’नुसार नवीन प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सादर केला आहे. पीएमआरडीएचा मेट्रो प्रस्ताव ६ हजार ४00 कोटींचा असून, या प्रकल्पासंदर्भातील आवश्यक करार केले जाते, असे पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे. शहरातील नियोजित मेट्रो मार्गावर युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. परिणामी पुणेकरांच्या सेवेसाठी लवकरच मेट्रो दाखल होणार आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाकडून अद्याप पीएमआरडीएच्या मेट्रोस मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे या मेट्रोचे काम केव्हा सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. परंतु, येत्या मंगळवारी (दि. २) होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मेट्रोस मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे