शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ने खास महिलांसाठी सुरु केलेली ‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 11:47 IST

मागील वर्षी जागतिक महिला दिनी ‘पीएमपी ’ ने तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. वर्षभरात या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्देएवढ्या मोठ्या प्रमाणावर खास महिलांसाठी बससेवा पुरविणारी पीएमपी देशातील पहिलीच सार्वजनिक संस्था मार्च २०१८ पासून आतापर्यत तेजस्विनी बसमधून प्रति महिना २ लाख ३३ हजार तर वर्षभरात २८ लाख महिलांनी केला प्रवासतिकीट तपासणीसाठी दामिनी पथकाची नियुक्ती

पुणे : महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी आदर्शवत ठरत आहे. सध्या एकुण ३८ बसमार्फत ही सेवा दिली जात असून मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बसची त्यात भर पडणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खास महिलांसाठी बससेवा पुरविणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही देशातील पहिलीच सार्वजनिक संस्था असल्याचे पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.जागतिक महिला दिनी तेजस्विनी बससेवेला वर्ष पुर्ण होत आहे. मागील वर्षभरात या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मागील वर्षी जागतिक महिला दिनी ‘पीएमपी ’ ने तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. त्यापूर्वीही पीएमपीकडून खास महिलांसाठी विशेष बससेवा होती. मात्र, बसचे प्रमाण कमी होते. राज्य शासनाने पुण्यासह अन्य काही शहरांमध्ये खास महिलांसाठी बस पुरविण्याचा निर्णय घेतला. या सेवेला तेजस्विनी  नाव देण्यात आले. याअंतर्गत पीएमपी प्रशासनाने ही मागील वर्षी ही सेवा सुरू केली. मात्र, शासनाकडून बस वेळेत उपलब्ध न झाल्याने पीएमपीच्या ताफ्यात आलेल्या मिडी बसच्या माध्यमातून महिलांना बस उपलब्ध करून देण्यात आल्या. या सेवेला महिलांचा प्रतिसाद वाढत गेल्याने टप्प्याटप्याने बस, फेºया व मार्ग वाढविण्यात आले. आता दर महिन्याच्या ८ तारखेला ही सेवा मोफत दिली जाणार आहे.सध्या पुणे व पिंपरी चिंचवडमधील एकुण १४ मार्गांवर ही बससेवा सुरू आहे. एकुण ३८ बसच्या माध्यमातून दररोज या बससेवेच्या ४६४ फेºया होत आहेत. मागील महिन्यात शासनाच्या अत्याधुनिक सहा तेजस्विनी बस ताफ्यात दाखल झाल्या. त्याही बस आता संचलनात आणण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पासून आतापर्यत तेजस्विनी बसमधून प्रति महिना २ लाख ३३ हजार तर वर्षभरात २८ लाख महिलांनी प्रवास केला आहे. यातुन प्रति महिना ३४ लाख ३७ हजार तर ४ कोटी १२ लाख ५२ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले आहे. पीएमपीला प्रति किलोमीटर ३३ रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सर्व बसमध्ये महिला वाहकांचीच नेमणुक करण्यात आली आहे. तिकीट तपासणीसाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने आणखी २७ बस पीएमपीला मिळणार आहेत. त्यामुळे तेजस्विनीच्या ताफ्यात आणखी भर पडणार आहे............देशात महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बससेवा अन्य कोणत्याही शहरात नाही. त्यामुळे ही सेवा पथदर्शी आहे. सध्या या सेवेला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना आहे. नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, नागरिकांकडून त्यांच्या भागात ही सेवा सुरू करण्याची सातत्याने मागणी होत आहे. मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बस मिळाल्यानंतर मार्ग वाढविले जातील. - नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपुणे महानगर परिवहन महामंडळ

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेWomenमहिला