श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीचे सारथ्य

By Admin | Updated: December 13, 2014 00:47 IST2014-12-13T00:47:06+5:302014-12-13T00:47:06+5:30

सुधारण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक महासंचालक डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीच्या प्रभारी व्यवस्थापकीय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार आज देण्यात आला.

PMP's saritya to Shrikar Pardeshi | श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीचे सारथ्य

श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीचे सारथ्य

पुणो : नादुरुस्त असल्याने बंद पडलेल्या बस, बसच्या सुटय़ा भागांच्या खरेदीतील गैरव्यवहराचे आरोप आणि अकार्यक्षम प्रशासनामुळे तोटय़ात असलेल्या पुणो महानगर परिवहन महामंडळचा (पीएमपी) कारभार सुधारण्यासाठी नोंदणी  
आणि मुद्रांक महासंचालक डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीच्या प्रभारी व्यवस्थापकीय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार 
आज देण्यात आला. त्यामुळे पुणोकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.   
पुण्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन आठवडय़ांपूर्वी बैठक झाली. त्या वेळी लोकप्रतिनिधींनी पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी स्वतंत्र असा सक्षम अधिकारी देण्याची मागणी 
केली होती. त्यानुसार नागपूर अधिवेशन काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्याचे आदेश आज दिले.  
डॉ. श्रीकर परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त असताना अनधिकृत बांधकामावर मोठय़ा प्रमाणात कारवाई केली होती. त्याच काळात काही महिन्यांसाठी त्यांच्याकडे पीएमपीचा प्रभारी कारभार दिला होता. कमी अवधीमध्ये ही त्यांनी नवीन सुधारणांसाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे परदेशी यांच्याकडे पीएमपीचा कारभार देण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार डॉ. परदेशी यांच्याकडे पदभार दिल्याने पुणोकरांनी आशावाद व्यक्त केला आहे.  
(प्रतिनिधी)
 
डॉ. परदेशी 
यांच्यापुढील आव्हाने..
पीएमपी ही स्वतंत्र कंपनी असून, कारभार मात्र राजकीय दबावाखाली होतो. दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष पीएमपीच्या संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप थांबवून कारभार सुधारण्याची गरज आहे. सद्य:स्थितीत पीएमपीला सुमारे 250 कोटी रुपयांचा तोटा असून, दिवसेंदिवस तोटा वाढत आहे. बसदुरुस्तीसाठी पैसे नसल्याने सुमारे 65क् बस बंद अवस्थेत आहेत. पीएमपीच्या कारभारावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. बीआरटी प्रकल्पाचे योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्याचे आव्हान डॉ. परदेशी यांच्या समोर आहे. 
 
शासनाकडून पीएमपीचा अतिरिक्त कारभार देण्यात आल्याचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार लवकरच पदभार स्वीकारणार आहे. सद्य:स्थितीतील पीएमपीचा कारभाराची माहिती घेऊन पुढील आराखडा ठरविणार आहे. 
- डॉ. श्रीकर परदेशी, महासंचालक 
 
पीएमपीसाठी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती हा मुख्यमंत्र्यांचा स्वागतार्ह निर्णय आहे. पुणो व पिंपरी-चिंचवड शहरातील कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. आतार्पयत त्यांनी जे काम हाती घेतले, ते उत्कृष्टपणो पूर्ण केले. त्यामुळे पीएमपीचा कारभार पारदर्शक करून सक्षम करतील, अशी अपेक्षा आहे.
- जुगल राठी, 
पीएमपी प्रवासी मंच 

 

Web Title: PMP's saritya to Shrikar Pardeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.