शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’चा आराखडा मार्गावर, पदोन्नतीची नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:36 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नवीन आस्थापना आराखड्यातील पदभरती, पदोन्नतीबाबतच्या अटी व शर्तींची नियमावली दि. ९ फेब्रुवारी रोजी होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नवीन आस्थापना आराखड्यातील पदभरती, पदोन्नतीबाबतच्या अटी व शर्तींची नियमावली दि. ९ फेब्रुवारी रोजी होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे. ही नियमावली मान्यझाल्यानंतर आस्थापना आराखड्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.‘पीएमपी’च्या निर्मितीनंतर दहा वर्षे आस्थापना आराखड्याचे काम रेंगाळले होते. आराखडा नसल्याने कर्मचारी भरती, पदोन्नती तसेच प्रशासकीय कामकाजात अडथळे येत होते. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले असून, त्याची काही अंशी अंमलबजावणीही सुरू केली आहे. यामध्ये ११ हजार ३८४ पदांचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. सरळभरतीने तसेच खातेअंतर्गत भरावयाच्या पदसंख्या, पदोन्नतीसाठीच्या अटी व शर्तींबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली मंजुरीसाठी दि. ९ फेब्रुवारी रोजी होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे. नवीन सेवा नियमावलीमध्ये काही नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. तर काही पदांच्या नावातही बदल केला गेला आहे. एकूण ५९ संवर्गामध्ये ११ हजार ३८४ पदांचा आकृतिबंद तयार करण्यात आला आहे. यामध्ये ४८०० वाहक व ३८४० चालकांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. रोजंदारी, सरळ सेवा तसेच प्रतिनियुक्ती या माध्यमातून विविध पदे भरली जाणार आहेत. सर्व कर्मचारी व अधिकाºयांची कामाची जबाबदारी व कर्तव्यही निश्चित करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे.>औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार पीएमपीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत सर्वसंबंधितांना नोटीस पाठविली होती. त्यानुसार दि. २ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती.ही मुदत संपली असून, आराखड्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, हरकतींवर सुनावणी झाल्याशिवाय आराखड्याची अंमलबजावणी करता येणार नाही. तसे झाल्यास ते बेकायदेशीर ठरेल, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल