पीएमपीच्या १०० जादा गाड्या
By Admin | Updated: September 25, 2016 04:55 IST2016-09-25T04:55:21+5:302016-09-25T04:55:21+5:30
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रविवारी (दि. २५) शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना आपल्या वाहन पार्किंग केलेल्या

पीएमपीच्या १०० जादा गाड्या
पुणे : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रविवारी (दि. २५) शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना आपल्या वाहन पार्किंग केलेल्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी पीएमपीकडून तब्बल १०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मोर्चासाठी शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आल्याने या रस्त्यांवरील पीएमपी बसचे मार्ग बदलण्यात येणार असून मोर्चा संपल्यानंतर या बसेस नियमितपणे सोडण्यात येणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजीराजे पुतळ््यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्ते नदीपात्राच्या परिसरात एकत्र येणार आहेत. शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. या मोर्चात सुमारे वीस ते २५ लाखांहून अधिक कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक मार्गांत बदल
मोर्चासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील मोर्चामार्गाला जोडणारे प्रमुख रस्ते सकाळपासूनच बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पीएमपीकडूनही या मार्गांवर धावणाऱ्या बसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. त्यानंतर मोर्चा पुढे जाताच संबंधित रस्त्यांवरील बसेस पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.