शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गैरहजेरीच्या कारणास्तव करण्यात आलेल्या कारवाईत पीएमपीचे प्रामाणिक कर्मचारीही घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:49 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे‘पीएमपी’ने काही दिवसांपूर्वी केली १५८ बदली हंगामी रोजंदारी चालकांवर बडतर्फीची कारवाईखातेनिहाय चौकशी करून त्यांना बचावाची संधी देणे आवश्यक : सुनील नलावडे

पुणे : गैरहजेरीच्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये काही प्रामाणिक चालकांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. ‘पीएमपी’ प्रशासनाने काही दिवसांपूर्वी १५८ बदली हंगामी रोजंदारी चालकांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. सातत्याने गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाने दरमहा नियमानुसार २२ दिवस हजेरीचा निकष निश्चित केला आहे. त्यानुसार आॅगस्ट ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांत त्यापेक्षा कमी दिवस हजेरी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईमध्ये २२ दिवसांहून अधिक हजेरी असलेल्या चालकांनाही बडतर्फ करण्यात आल्याचे राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी सांगितले. चालकाच्या पगारपत्रानुसार त्याचे आॅगस्ट महिन्यात २३, सप्टेंबर २२, आॅक्टोबर २४, नोव्हेंबर ३०, डिसेंबर २५ असे पगारी दिवस भरले आहेत. एकही महिन्यात २२ दिवसांपेक्षा कमी हजेरी नाही. त्यामुळे प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची अशा प्रकारे आणखी काही चालकही भरडले गेले आहेत, असे नलावडे यांनी सांगितले. तसेच सेवानियम ७५(५) मधील तरतुदीनुसार संबंधित सेवकांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बचावाची संधी देणे आवश्यक आहे. पण १५८ चालकांना ही संधी न देता सेवा संपुष्टात आणली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणीही नलावडे यांनी केली आहे.स्वारगेट आगारातील एका चालकालाही प्रत्यक्ष कामावर हजर असल्याचे प्रमाण असमानाधानकारक असल्याबद्दल त्याची सेवा संपुष्टात करण्यात आली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीमधील गैरहजर दिवस २४ व बिनपगारी ४ आहेत तसेच नियमानुसार दरमहा २२ दिवस इतके हजेरीचे दिवस असताना ते कमी असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे