शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचा रोजच प्रवाशांच्या जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:44 IST

निगडी-कात्रज बीआरटी बस : दरवाजे उघडे राहिल्याने धोका

पुणे : पुणे शहराची एकमेव वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. मार्गावर ब्रेकडाऊनचे प्रमाण कायम असतानाच आज निगडीवरून कात्रजला जाणाऱ्या बसचे बीआरटीचे दरवाजे उघडे असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. या बसमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी असल्याने एखाद्याचा धक्का लागून चालत्या बसमधून कोणी पडले असते तर एखाद्याला आपला जीव गमवावा लागला असता. त्यामुळे पीएमपी प्रशासन बसची देखभाल-दुरुस्ती वेळेवर करणार का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

निगडीवरून कात्रजकडे जाणारी ४२ क्रमांकाच्या एका बसचे बीआरटीच्या बाजूला असणारे दरवाजे उघडे होते. निगडी ते कात्रज हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या बसला गर्दी होती. बीआरटीचे दार उघडे असल्याने अनेक प्रवासी हे या दारांमध्ये उभे होते. काहीतर बाहेर डोकावून सुद्धा पाहत होते. बस वेगात असताना एखाद्याचा धक्का लागून प्रवासी खाली पडला असता तर त्याचा जीव जाण्याची शक्यता होती. बस अनेकदा वेगात असताना खड्ड्यात आदळते. किंवा स्पीड ब्रेकरवरुनही बस जाताना मोठे हादरे बसत असतात अशात हे दरवाजे उघडे असल्याने अपघात घडण्याची शक्यता अधिक होती. या दरवाज्यांच्या बाजूला काही तरुणीसुद्धा उभ्या होत्या. या बसमधील प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत होता. पीएमपी बसेसची अनेकदा देखभाल योग्य प्रकारे केली जात नाही. त्यातही खासगी कंत्राटदार हे बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे बसेस मार्गावर बंद पडणे. बीआरटीचे दरवाजे काम न करणे अशा अनेक समस्या रोज निर्माण होत असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो. त्यातच इतर शहरांच्या तुलनेत प्रवासी भाडे अधिक असल्याने अनेक नागरिक हे स्वत:च्या वाहनाचा उपयोग करतात.

पीएमपी प्रशासन एकीकडे नागरिकांना जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याबाबत आवाहन करत असते. तर दुसरीकडे प्रवाशांना योग्य त्या सोयीसुविधा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर धोकादायक वाहतूक करणाºया खासगी वाहनांवर पोलीस प्रशासन जशी कारवाई करत असते तशीच कारवाई पीएमपीवर करणार का, असा सवालही आता सर्वसामान्य विचारत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल