पीएमपीचा सीएनजी गॅसपुरवठा बंद करणार

By Admin | Updated: June 3, 2015 04:50 IST2015-06-03T04:50:05+5:302015-06-03T04:50:05+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सीएनजीवरील बसेसला गॅसपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने गुरुवारपासून

PMP's CNG gas supply will be closed | पीएमपीचा सीएनजी गॅसपुरवठा बंद करणार

पीएमपीचा सीएनजी गॅसपुरवठा बंद करणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सीएनजीवरील बसेसला गॅसपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने गुरुवारपासून गॅसपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. पीएमपीकडे तब्बल ३५ कोटी रुपये थकल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक मिलिंद शेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हे संकट टाळण्यासाठी पीएमपीकडे एकच दिवस शिल्लक राहिला आहे; अन्यथा पीएमपीची बससेवा कोलमडून जाण्याची शक्यता आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात २१०० बस असून, त्यांपैकी सुमारे १२०० बस सीएनजी गॅसवर चालणाऱ्या आहेत. या बसला ‘एमएनजीएल’मार्फत २००९ पासून गॅसपुरवठा केला जातो. पीएमपीच्या खर्चात बचत होत असल्याने प्रशासनाने सीएनजी बसेसला अधिक प्राधान्य दिले आहे. या बसेससाठी दर दहा दिवसाला सुमारे ३ कोटी रुपयांचा गॅस लागतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून ‘पीएमपी’ने गॅसचे पैसे न दिल्याने कंपनीने आता गॅस पुरविण्यास असमर्थता दर्शविली आहे. येत्या गुरुवारपासून पीएमपीचा गॅसपुरवठा बंद करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
याविषयी ‘लोकमत’शी बोलताना शेट्टीवार म्हणाले, की पीएमपीकडून दोन दिवसांत एकही धनादेश मिळालेला नाही. पीएमपीकडून चुकीची माहिती दिली जात आहे. पीएमपीकडे सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पीएमपीकडून कधीही वेळेवर पैसे दिले गेले नाहीत. सातत्याने पाठपुरावा करून थकबाकी वाढतच गेली आहे. ही थकबाकी खूप मोठी आहे. त्यामुळे आता आम्हालाही गॅसपुरवठा करणे अशक्य होऊ लागले आहे. ही थकबाकी वाढत गेली तर मुख्य कंपनीतून गॅस मिळणे बंद होईल. त्याबाबत पीएमपीसह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. पैसे न मिळाल्यास गुरुवारपासून गॅसपुरवठा बंद करण्यावर आम्ही ठाम आहोत.

Web Title: PMP's CNG gas supply will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.