शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या २५ वातानुकूलित ई-बस मार्गावर : संबंधित मार्गावरील प्रवाशांना मिळाला दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:20 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ ई-बसचे लोकार्पण झाले. त्यानंतर मंगळवारपासून मार्गावर १० बस धावण्यास सुरूवात झाली.

ठळक मुद्देया बससाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील एकुण सात मार्ग निश्चित उर्वरीत १५ ई-बसची नोंदणी न झाल्याने झाला उशीर पहिल्या दिवशी आठ ई-बसद्वारे सुमारे ३५ हजार रुपयांचे उत्पन्न भेकराईनगर व निगडी आगारामध्ये ई-बसचे चार्जिंग स्टेशन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या सर्व २५ वातानुकूलित ई-बस मार्गावर धावू लागल्या आहेत. या बससाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील एकुण सात मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित मार्गावरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. ९) २५ ई-बसचे लोकार्पण झाले. त्यानंतर मंगळवारपासून मार्गावर १० बस धावण्यास सुरूवात झाली. केवळ याच बसची नोंदणी न झाल्याने उर्वरीत बस मार्गावर येऊ शकल्या नाहीत. आता उर्वरीत १५ ई-बसचीही नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे त्या बसही मार्गावर सोडण्यास सुरूवात झाली आहे. सध्या सर्व २५ ई-बस मार्गावर धावू लागल्या आहेत. भेकराईनगर व निगडी आगारामध्ये ई-बसचे चार्जिंग स्टेशन आहेत. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनुक्रमे चार व तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावरील प्रवाशांना ई-बसमुळे दिलासा मिळाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी आठ ई-बसद्वारे सुमारे ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. प्रवाशांना संबंधित बसच्या वेळा माहिती होईल त्याप्रमाणे या बसचा प्रतिसाद वाढत चालला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, दुसऱ्या टप्प्यामध्ये पीएमपीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या बीआरटीसाठी योग्य असलेल्या १२५ बस घेण्याचे नियोजन आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात या बसही मार्गावरील येतील. एकुण ५०० ई-बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.-------------  या मार्गावर धावणार ई-बस   १. हडपसर ते पिंपळे गुरव  बस - ३  फेऱ्या - ६०  २. भेकराईनगर ते न. ता. वाडी  बस - ३  फेऱ्या - ४८  ३. भेकराईनगर ते पुणे स्टेशन  बस - ३  फेऱ्या - ५४  ४. हडपसर ते हिंजवडी माण फेज ३  बस - ३  फेऱ्या - १८  ५. डांगे चौक ते हिंजवडी माण फेज ३   बस - ६  फेऱ्या - ९६  ६. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा  बस - २  फेऱ्या - २०  ७. निगडी ते भोसरी  बस - २  फेऱ्या - ४८  ----------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस