शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 21:06 IST

पीएमपीचा मार्ग दर्शविणाऱ्या पाट्या याेग्य ठिकाणी लावणे अपेक्षित असताना, त्या कुठेही लावण्यात येत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरुन रात्रीच्या वेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे कळण्यास अडचण येत अाहे.

पुणे : पीएमपीचा मार्ग सांगणाऱ्या पाट्या प्रवाशांना दिसतील अशा जागी लावणे अपेक्षित आहे. त्याचबराेबर त्या पाट्यांवर रात्रीच्यावेळी प्रकाश असणे सुद्धा अावश्यक अाहे. परंतु पीएमपीच्या बहुतांश बसेसच्या पाट्या या खाली बसच्या काचेच्या येथे लावण्यात येतात. त्याचबराेबर त्यावर रात्रीच्यावेळी प्रकाशही नसताे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्यावेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे समजणे अवघड जात असल्याचे चित्र अाहे.     पीएमपी ही पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा असल्यामुळे माेठ्याप्रमाणावर प्रवासी पीएमपीने प्रवास करीत असतात. सुरुवातीपासूनच सक्षम वाहतूक व्यवस्था पुरविण्यात पीएमपी प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र अाहे. मधल्या काळात तुकाराम मुंडे यांनी ही व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला हाेता. परंतु अाता पुन्हा परिस्थिती बदलत असल्याचे चित्र अाहे. बस ज्या मार्गावर धावत अाहे, त्या मार्गाची पाटी हि प्रवाशांना दिसेल अश्या भागात लावणे अपेक्षित अाहे. त्याचबराेबर रात्रीच्यावेळी त्यावर प्रकाश असणे गरजेचे अाहे. जेणेकरुन प्रवाशांना बस कुठली अाहे हे कळण्यास मदत हाेईल. परंतु पीएमपीच्या अनेक जुन्या बसेसच्या पाट्या या चालकाच्या शेजारील काचेच्या येथे खालच्या भागात लावण्यात येत असल्याने प्रवाशांना कुठल्या मार्गावरील बस अाहे हे समजणे अवघड जात अाहे. खासकरुन रात्रीच्यावेळी कुठली बस अाहे हे लांबून कळत नाही. बस जवळ अाल्यानंतर त्यावरील पाटी वाचता येते. अनेकदा बसवरील पाटी अंधारात वाचता येत नसल्याने प्रवासी बसच्या समाेर येत असतात. त्यामुळे अपघात हाेण्याची शक्यता अाहे. तसेच अनेकदा कुठली बस अाहे हे कळत नसल्याने बस चुकण्याचेही प्रकार घडत असतात.     याबाबत बाेलताना रुपा भुतके ही तरुणी म्हणाली, अनेक बसेसच्या पाट्या या खालच्या भागात लावण्यात येत असल्याने त्या पटकन दिसत नाही. या पाटीवर लाईटही नसते. तसेच बसच्या प्रखर लाईटमुळे ही पाटी वाचताही येत नाही. त्यामुळे बस जवळ अाल्याशिवाय ती कुठल्यामार्गावरील बस अाहे हे समजत नाही. बसवरील पाटी वाचता न अाल्याने अनेकदा बस चुकली अाहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने याेग्य ठिकाणी पाटी लावून त्यावर लाईट लावायला हवी. नाव न छापण्याच्या अटीवर पीएमपीचे एक वरिष्ठ अधिकारे म्हणाले, नव्या बसेसला एलईडी स्क्रीन असल्याने त्यांच्या पाट्यांचा प्रश्न येत नाही. ज्या बसेसला एलईडी स्क्रीन नाही त्या बसेसच्या पाट्यांवर अाम्ही येत्या काळात लाईट लावण्याची व्यवस्था करणार अाहाेत. तसेच जे चालक एलईडी स्क्रीन सुरु करत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलnewsबातम्याpassengerप्रवासी