शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यभागातील रस्त्यावर ब्रेक डाऊन बंदच          

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 21:03 IST

शहराच्या मध्यभागात अचानक बंद पडणाºया पीएमपीएल च्या गाड्या यापुढे रस्त्यावर आणल्याच जाणार नाहीत. त्याऐवजी शहरातील सर्व हमरस्त्यांवर नव्या, चांगल्या बस वापरण्याचा निर्णय पीएमपीएल व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला

पुणे: शहराच्या मध्यभागात अचानक बंद पडणाºया पीएमपीएल च्या गाड्या यापुढे रस्त्यावर आणल्याच जाणार नाहीत. त्याऐवजी शहरातील सर्व हमरस्त्यांवर नव्या, चांगल्या बस वापरण्याचा निर्णय पीएमपीएल व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार विजय काळे यांनी यावरून पीएमपीएल वर टीका करत त्यांच्याच कार्यालयात गुरूवारी बैठक घेतली. पीएमपीएल च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय तुळपुळे, मुख्य अभियंता  बुरसे, वाहतूक व्यवस्थापक वाघमारे, भांडार प्रमुख रूपनवर, जाहिरात विभागाचे रॉड्रीक्स, प्रशासन अधिकारी गायकवाड आदी बैठकीला उपस्थित होते. पीएमपीएल बाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत काळे यांनीच अशा बैठकीची मागणी गुंडे यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे गुरूवारी झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.पीएमपीएमएलच्या स्वत:च्या मालकीच्या १ हजार ३६१ बसेस रस्त्यावर धावतात. त्याशिवया भाडे तत्वावरील ५७७ व इलेक्ट्रिक २५ बस रस्त्यावर आहेत. भाडे तत्वावर घेतलेल्या गाडट्यांचे ठेकेदार कंपनीला किलोमीटरप्रमाणे पैसे दिले जातात. त्यांची एकही बस बंद पडणे गैर असताना एकूण २० टक्के बसेस दररोज ब्रेक डाउन होत असतात. रस्त्यावर धावत असलेली गाडी अचानक बंद पडल्याने त्याचा वाहतूकीला त्रास होतो असे काळे यांनी बैठकीत सांगितले. बंद पडलेल्या पीएमपीएल गाडीमुळे वाहतूक कोंडीला निमित्त मिळते असे ते म्हणाले. 

-शेजारीशेजारी बसस्टॉप सर्व्हे करून त्यातील अनावश्यक बसस्टॉप काढून टाकण्यात येतील.

 -खरेदी करण्यात आलेल्या सुट्या भागांना तज्ज्ञ संस्थांकडून प्रमाणित करून घेण्यात येईल.

-वाहनांना लागणाºया आगीपासून बचावाचे प्रशिक्षण कर्मचाºयांना देणे

-नव्याने समाविष्ट होणाºया ४०० सीएनजी बससाठी नवी दिल्लीच्या डीटीडीसी धर्तीवर कर्मचाºयांसाठी गुणवत्ता सुधारणा कार्यशाळा घेणे

 -कंपनीच्या वास्तूत सुट्या भागांचे दुकान सुरू करणे

-खडकीमध्ये बसस्थानक सुरू करणे

 -खडकी, साप्रस, औंध ,औंधगाव, रेंजहिल्स, बोपोडी, बाणेर या ठिकाणी बसवाहतूक सुरू करणे

- शहरातील सर्व बसथांभ्यावर  येण्याजाण्याचे त्याठिकाणी खडकी कॅन्टोंनमेंट बोर्डाच्या मदतीने नव्याने बीओटी तत्वावर खडकी बस स्थानक विकसित करण्याला मान्यता

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघात