शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सुटीच्या दिवशी आता पुण्यातील पर्यटनस्थळ फिरा पीएपीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 20:58 IST

सुटीच्या दिवशी प्रवासी संख्या कमी असल्याने पीएमपीच्या उत्पन्नात माेठ्याप्रमाणावर घट हाेते. त्यासाठी पीएमपीने नवी याेजना आखली आहे.

पुणे : सुट्टीच्या दिवशी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कमी उत्पन्न मिळते. आता राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने दोन सुट्टयांची भर पडल्याने पीएमपीचे उत्पन्न आणखी कमी होणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सिंहगड, केतकावळे, देहू, आळंदी, सासवड यांसह विविध लांबपल्याच्या मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये ५० हून अधिक मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.

‘पीएमपी’चे दैनंदिन उत्पन्न जवळपास १ कोटी ६० लाख रुपये एवढे आहे. पण सुट्टीच्या दिवशी त्यामध्ये ३० ते ३५ लाख रुपयांची घट होते. यापुर्वी दर  महिन्यातील प्रत्येक रविवार, दुसरा व चौथा शनिवार तसेच सण-उत्सवाच्या सुट्यांमुळे पीएमपीला कमी उत्पन्न मिळत होते. त्यातच आता राज्य शासनाच्या कार्यालयांना पाचच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. दि. २९ फेब्रुवारीपासून प्रत्येक शनिवारी सुट्टी असणार आहे. याचा फटका पीएमपीला बसणार आहे. दि. १६ ते २२ फेब्रुवारी या आठवड्याचा विचार केल्यास १६ तारखेला रविवार, १९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २१ तारखेला महाशिवरात्री आणि २२ तारखेला चौथा शनिवार अशा चार सुट्टया आल्या आहेत. या सुट्यांमुळे पीएमपीला आठवड्यात तब्बल सव्वा कोटी रुपये उत्पन्न कमी मिळणार आहे.

आधीच पीएमपीची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सुट्टयांमुळे त्यात आणखी भर पडत आहे. ही तुट भरून काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने सुट्टीच्या दिवशी पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतची ऐतिहासिक व धार्मिक स्थळे तसेच अन्य लांबपल्याच्या मार्गांवर जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे ५० हून अधिक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सिंहगड, केतकावळे, सासवड, तळेगाव ढमढेरे, उरुळीकांचन, तळेगाव दाभाडे,  देहू, आळंदी आदी मार्गावर दररोजचे बसेस व्यतिरिक्त जादा बसेस देऊन उत्पन्न वाढीसाठी नियोजन करण्यात आले आहे. अशा सर्व मार्गावर फक्त सुट्टीत तीन ते चार बसेस जादा अशा एकत्रित १०० ते १५० बसेस जादा सोडण्यात येणार आहेत.

सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळी साेडण्यात येणार जादा बसेस 

सुट्टीच्या दिवशी पीएमपीच्या बस सकाळी नियमित वेळापत्रकानुसार धावतात. पण प्रवासी मिळत नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यादिवशी अनेक जण लांब पल्ल्याच्या प्रवासाचे दुपारनंतर नियोजन करतात. त्यासाठी सकाळच्या सत्रातील बस कमी करून दुपारनंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर नियमित बससह जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.- अनंत वाघमारे, वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेPuneपुणे