शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पीएमपीचा ‘चिल्लर’ प्रश्न सुटला : रिझर्व्ह बँकेचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 19:44 IST

प्रवाशांना तिकीटाचे उर्वरित पैसे देताना अधिकाधिक चिल्लर वापरात आणावी, याबाबतही बँकेने पीएमपीला सुचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देसेंट्रल बँक आॅफ इंडिया स्वीकारणार चिल्लरपीएमपीचे १३ आगारांमार्फत पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या परिसरात बससेवा सध्या सुमारे २० लाख रुपयांची चिल्लर होती पडून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही महिन्यांपासून अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या ‘चिल्लर’ प्रश्नातून पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची सुटका झाली आहे. रिझव्हॅ बँकेने सेंट्रल बँक आॅफ इंडिया चिल्लर स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रवाशांना तिकीटाचे उर्वरित पैसे देताना अधिकाधिक चिल्लर वापरात आणावी, याबाबतही बँकेने पीएमपीला सुचना दिल्या आहेत.पीएमपीचे १३ आगारांमार्फत पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या परिसरात बससेवा पुरविली जाते. सर्व आगारांमार्फत तिकीट व पास विक्रीतून जमा झालेली दैनंदिन रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या कॅम्प शाखेमध्ये जमा केली जाते. सुमारे दीड कोटी रुपयांमध्ये जवळपास दररोज दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. आतापर्यंत बँकेकडून विनातक्रार ही चिल्लर स्वीकारली जात होती. मात्र दि. ४ आॅक्टोबरपासून बँकेने चिल्लर घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे सर्व आगारांमध्ये दररोजच्या चिल्लरचा ढीग लागला होता. सध्या सुमारे २० लाख रुपयांची चिल्लर पडून होती. यातून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने बँकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. पण हा प्रश्न सुटत नव्हता.अखेर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाºयांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी सेंट्रल बँक व पीएमपी अधिकाऱ्यांची बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पीएमपीने वाहकांना सकाळी काम सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या रकमेच्या स्वरुपातील ठराविक रकमेची नाणी द्यावीत, त्यांनी प्रवाशांकडून तिकीट विक्रीची रक्कम वसुल करताना उरलेले पैसे चिल्लर स्वरूपात द्यावेत, बँकेत नाणे स्वरूपातील रक्कम भरणा करताना एका बॅगेत एका प्रकारची शंभर नाणी जमा करावीत, तसेच बँकेने चिल्लर स्वीकारण्यास नकार देऊ नये, ही चिल्लर उपलब्धतेनुसार इतर शाखांमध्ये जमा करावी, अशी चर्चा यावेळी झाली. त्यानुसार दोन्ही बाजूने याला सहमती दर्शविण्यात आली. त्याप्रमाणे पीएमपी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे चिल्लरचा प्रश्न दोन महिन्यानंतर मार्गी लागला आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच चिल्लरची ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी पीएमपीच्या आगारात संपर्क साधून ही रक्कम उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक