पीएमपी कामगारांचा महापालिकेवर मोर्चा
By Admin | Updated: August 20, 2014 23:38 IST2014-08-20T23:38:12+5:302014-08-20T23:38:12+5:30
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनातील फरक एकरकमी मिळावा, या मागणीसाठी पीएमटी कामगार संघाने (इंटक) पीएमपी डेपो ते महापालिकेर्पयत मोर्चा काढला.

पीएमपी कामगारांचा महापालिकेवर मोर्चा
पुणो : सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनातील फरक एकरकमी मिळावा, या मागणीसाठी पीएमटी कामगार संघाने (इंटक) पीएमपी डेपो ते महापालिकेर्पयत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने कामगार सहभागी झाले होते.
पीएमपीच्या सुमारे 11 हजार कामगारांच्या वेतनातील फरक काही वर्षापासून रखडला आहे. काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने उपोषण केल्यानंतर फरकाची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला ‘इंटक’ने विरोध केला आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणो अपेक्षित होते. मात्र, त्यावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ‘इंटक’च्या वतीने बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. आयुक्त कुणाल कुमार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. इंटकचे सल्लागार गोपाळ तिवारी, अध्यक्ष राजेंद्र खराडे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नुरूद्दिन इनामदार, अशोक जगताप, राम पवार आदी उपस्थित होते. ‘इंटक’ला विश्वासात न घेता वेतनातील फरकाबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे खराडे
यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
4’सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम द्या
4 अकरा हजार कामगारांचा वेतनातील फरक रखडला
4 पीएमपी प्रशासनाकडून दुर्लक्षामुळे कामगार संतप्त