पीएमपी विभाजनाच्या मार्गावर
By Admin | Updated: December 13, 2015 23:43 IST2015-12-13T23:43:59+5:302015-12-13T23:43:59+5:30
शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला चांगल्या दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७मध्ये स्थापन करण्यात आलेल्या

पीएमपी विभाजनाच्या मार्गावर
पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला चांगल्या दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या विभाजनाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या विभाजनाबाबत आलेल्या मागणीनुसार, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेस पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी आपला आभिप्राय तातडीने पाठविण्याच्या सूचना नगर विकास विभागाने केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र नुकतेच पाठविण्यात आले असून अद्याप एकाही प्रशासनाने आपला अभिप्राय दिला नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही शहरांची वाहतूक व्यवस्था एकच असावी या उद्देशाने १९ आॅक्टोबर २००७ मध्ये पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली आहे. त्यात तत्कालीन पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण करण्यात आले. या वेळी या दोन्ही संस्था तोट्यात होत्या, तसेच त्यांची संपूर्ण आर्थिक जबाबदारी महापालिकेकडे होती. त्यानंतर ही कंपनी स्थापन झाल्यानंतर दोन्ही महापालिकांनी पहिली तीन वर्षे या कंपनीला आर्थिक मदत देण्याची तरतूद राज्यशासनाने केली होती. मात्र, या कंपनीच्या स्थापनेनंतर ही कंपनी तोट्यातच आहे. (प्रतिनिधी)