पीएमपीने सौजन्यपूर्वक सेवा द्यावी

By Admin | Updated: March 21, 2016 00:48 IST2016-03-21T00:48:19+5:302016-03-21T00:48:19+5:30

सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) सक्षम करणार आहोत

The PMP should be served with courtesy | पीएमपीने सौजन्यपूर्वक सेवा द्यावी

पीएमपीने सौजन्यपूर्वक सेवा द्यावी

पुणे : सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) सक्षम करणार आहोत. नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवा देताना सौजन्यपूर्वक वागणूक देणे आवश्यक आहे़ तसेच, पीएमपीने भाड्याने दिलेल्या मालमत्तांद्वारे उत्पन्न वाढवावे, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केली.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शिवाजीनगर ते कात्रज आणि मनपा ते निगडी या मार्गावर मर्यादित थांबा (एक्स्प्रेस) सेवेचा शुभारंभ रविवारी स्वारगेट बस स्थानक येथे झाला. त्या वेळी बापट बोलत होते. या बस गिरीश बापट यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आल्या आहेत.
पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी मर्यादित बसथांबा सेवेची सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगितले. राज्य शासनाने पीएमपीच्या कर्जास हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेतर्फे वाढीव आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षाही कृष्णा यांनी या वेळी व्यक्त केली.
पालकमंत्री गिरीश बापट व पीएमपीचे ज्येष्ठ कामगार यांच्या हस्ते या वेळी मर्यादित बसथांबा सेवेच्या बसला झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक अशोक येनपुरे,
पीएमपीचे अधिकारी, कामगार, वाहनचालक, वाहक व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The PMP should be served with courtesy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.