पीएमपी प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल
By Admin | Updated: November 23, 2015 00:38 IST2015-11-23T00:38:54+5:302015-11-23T00:38:54+5:30
प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दिड कोटींच्या वर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासी केंद्रीत करण़्यासाठी प्रशासनाकडून हालचाली

पीएमपी प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल
पुणे : प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दिड कोटींच्या वर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासी केंद्रीत करण़्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या अंतर्गत प्रवाशांच्या तक्रारींसांठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या अनुशंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच ही प्रणाली तयार होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रवाशांना चालक वाहक तसेच इतर तक्रारी असल्यास या तक्रारींसाठी काही कार्यालयीन क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा हे क्रमांक सुटटीच्या दिवशी बंद असतात, तर अनेकदा तक्रारी करण्यात येणारे दूरध्वनीच बंद असतात, या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संबधित व्यक्तीने केलेली तक्रार कोणाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली. त्याचे पुढे काय झाले याची कोणतीही माहिती कोणत्याही अधिका-याला नसते. तर आपल्या तक्रारीच पुढे
काय झाले याची साधी
कल्पनाही प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. (प्रतिनिधी)