शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळापासून पीएमपीची विशेष ई-बस सेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 21:06 IST

पीएमपी, पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे विमानतळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ई-बस सेवा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देबससेवेसाठी ५०, १००. १५० व १८० असे तिकीट दर निश्चित पाच मार्गांवर ४३ बसच्या माध्यमातून ही सेवा सुरू राहणार

पुणे : विमान प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शुक्रवार (दि. २३) पासून विशेष ई-बससेवा सुरू केली. विमानतळापासून शहरात पाच मार्गांवर या बस धावणार असून इतर प्रवाशांनाही या बसने प्रवास करता येणार आहे. मात्र या बससेवेसाठी ५०, १००. १५० व १८० असे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.  

पीएमपी, पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे विमानतळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ई-बस सेवा सुरू झाली आहे. एअरपोर्ट बस फॉर बिझनेस होम अ‍ॅन्ड हॉटेल कनेक्टिव्हिटी (अभि) या संकल्पनेअंतर्गत प्रवाशांना आकर्षित केले जाणार आहे. विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते विमानतळ परिसरातून पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार माधुरी मिसाळ, विमानतळ संचालक कुलदीप सिंग, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे आदी उपस्थित होते.

काही महिन्यांपुर्वी विमानतळावरून शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी बससेवा सुरू होती. परंतु वाढीव तिकीट दर तसेच विविध कारणांमुळे या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही. आता पहिल्यांदाच तिकीट दराच्या सुसुत्रीकरणासह ई-बस मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाच मार्गांवर ४३ बसच्या माध्यमातून ही सेवा सुरू राहील.-----------प्रवाशांसाठी सुविधा- वातानुकूलित यंत्रणा- प्रदुषणविरहित- बसमध्ये प्रशस्त जागा- सामान ठेवणे सोपे- वायफाय, इंटरनेटही उपलब्ध करून देणार- बसमध्येच विमानांच्या माहितीसाठी स्क्रीन लावणार- विमानतळावर बस मार्गांच्या माहितीसाठी एलईडी स्क्रीन लावणार- विमानतळ आवारात सहा ठिकाणी इंग्रजी व मराठीतून फलक----------------बसचे मार्ग- विमानतळ - कोथरूड - विमानतळ - ७ बस- विमानतळ - हडपसर - विमानतळ - ५ बस- विमानतळ - हिंजवडी - विमानतळ - १६ बस- विमानतळ - स्वारगेट - विमानतळ - ७ बस- विमानतळ - निगडी - विमानतळ - ८ बस------------------

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळPMPMLपीएमपीएमएल