‘पीएमपी’ला आशेचा किरण

By Admin | Updated: January 1, 2015 01:00 IST2015-01-01T01:00:04+5:302015-01-01T01:00:04+5:30

आर्थिक खड्डा पडल्याने अडखळत चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) नवीन वर्षात आशेचा किरण दिसू लागला आहे.

'PMP' hope ray | ‘पीएमपी’ला आशेचा किरण

‘पीएमपी’ला आशेचा किरण

राजानंद मोरे- पुणे
आर्थिक खड्डा पडल्याने अडखळत चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) नवीन वर्षात आशेचा किरण दिसू लागला आहे. मागील काही दिवसांत उत्पन्नात झालेली वाढ तसेच बसदुरुस्तीचा वाढलेला वेग पाहता, नवीन वर्ष ‘पीएमपी’ला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदांचा अतिरिक्त भार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या निर्णयांमुळे हा सकारात्मक बदल होताना दिसत आहे.
शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ची अवस्था मागील काही महिन्यांत खूपच दयनीय झाली होती. पैशांअभावी बंद बसची संख्या वाढत चालली होती. त्यामुळे प्रवाशांना चांगला बससेवा देणे कठीण जात होते. त्यातच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त झाल्यानंतर काही महिने सहव्यवस्थापकीय संचालकांकडे या पदाचा भार सोपविण्यात आला. अखेर डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे प्रवाशांसह सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
सुमारे १२ लाख प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी डॉ. परदेशी यांनी स्वीकारली आणि पाहता-पाहता बदल दिसू लागला. डॉ. परदेशी यांनी १४ डिसेंबरला पदभार स्वीकारला तेव्हा सुमारे ७०० बस बंद होत्या. केवळ १७ दिवसांत हा आकडा ५६६वर आला. बसच्या दररोजच्या उत्पन्नातील ६ टक्के हिस्सा सुट्टे भाग तसेच देखभाल-दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे बसदुरुस्तीसाठी वेगळा पैशांची तरतूद करणे आवश्यक असणार नाही. रस्त्यावरील बसची संख्या वाढल्याने उत्पन्नातही वाढ झाली आहे. यामध्ये भाडेवाढीचा काही वाटा असला, तरी अधिक बस वाढू लागल्याचाही परिणाम दिसू लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात पीएमपीला सुमारे ३७ कोटी २४ लाख रुपये उत्पन्न मिळाले. डिसेंबर महिन्यात हे उत्पन्न ४१ कोटी ८१ लाख रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. येत्या महिनाभरात किमान ३०० बस रस्त्यावर आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना बससेवेचा फायदा घेता येणार आहे.(प्रतिनिधी)

दिनांकबससंख्याउत्पन्न
१ १३३७१,४१,७८,४३४
५१३४५१,२१,४०,६६८
१०१३४९१,४०,५१,७०७
१५१२८६१,४९,३८,७९४
२०१३२९१,५३,७२,२७४
२२१३५९१,६९,५३,६२५
२५१४०९१,४०,१४,८५७
३०१४५२१,४६,८३,०९६

परदेशी यांनी घेतलेले निर्णय
च्दोन महिन्यांत बंद बसपैकी ८५ टक्के बस मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट
च्तोपर्यंत अधिकाऱ्यांचे वेतन न देण्याची भूमिका
च्बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र बँक खाते
च्रोजच्या उत्पन्नातील ६ टक्के रक्कम राखीव
च्अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत
च्ठेकेदारांच्या बसचे स्वतंत्र आॅडिट
च्इतर उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू
च्दोन्ही महापालिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पुढाकार

Web Title: 'PMP' hope ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.