शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

वर्षानंतरही पीएमपी होईना ई-कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:26 IST

प्रवाशांना बसेसची माहिती रिअल टाईम मिळावी, या प्रमुख उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘पीएमपी ई-कनेक्ट’ अ‍ॅपला प्रवाशांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही

पुणे : प्रवाशांना बसेसची माहिती रिअल टाईम मिळावी, या प्रमुख उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘पीएमपी ई-कनेक्ट’ अ‍ॅपला प्रवाशांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सुमारे १० लाख प्रवासी संख्या असूनही जवळपास ५० हजार प्रवाशांनीच हे अ‍ॅप मोबाइलमध्ये घेतल्याचे दिसते. तसेच बसचे अपुरे वेळापत्रक, नेटवर्कमधील अडचणी, रिअल टाईमचा दावा फोल ठरत असल्याने ‘पीएमपी’ वर्षभरानंतरही प्रवाशांशी ‘ई-कनेक्ट’ झालेले नाही.पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांना थेट पीएमपीशी जोडण्याच्या उद्देशाने ‘पीएमपी ई-कनेक्ट’ हे अ‍ॅप तयार केले. दि. ७ जून रोजी हे अ‍ॅप प्रवाशांसाठी खुले केले. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक बसची ‘रिअल टाईम’ वेळ कळावी, त्यानुसार त्यांना प्रवासाचे नियोजन करणे सोपे जावे, बसचे सध्याचे ठिकाण, बससेवेविषयी तक्रारी, वेळापत्रक अशा विविध गोष्टींचा समावेश या अ‍ॅपमध्ये करण्यात आलेला आहे. मात्र, जवळपास वर्ष पूर्ण होऊनही अद्यापही अ‍ॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिकाधिका प्रवाशांनी या अ‍ॅपचा उपयोग करणे अपेक्षित होते. परंतु, मागील वर्षभरात जवळपास ५० हजार प्रवाशांनीच हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. त्यापैकी अनेक प्रवाशांनी अ‍ॅपचा वापर बंद केला आहे.‘रिअल टाईम’चा प्रशासनाचा दावा फोलच ठरत आहे. प्रवाशांना अ‍ॅपवर एखादी बस काही मिनिटांत येणार असल्याचे दिसते. मात्र, काही वेळाने पुन्हा त्यात बदल होऊन नवीन वेळ येते. बस संबंधित स्थानकावरून गेल्यानंतर ती येणार असल्याचे वेळ दर्शविली जाते.थांब्यावर दिलेल्या वेळेत बस येत नाही, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. बसथांब्यांची माहिती, तिथपर्यंत जाण्याचे पायी अंतर, बसेसच्या वेळा अ‍ॅपवर दिसत आहे. पण ज्या हेतूने हे अ‍ॅप तयार करण्यात आले, तो हेतूच साध्य होताना दिसत नाही. गुगल प्ले स्टोअरवर अ‍ॅप डाऊनलोड केलेल्यांपैकी १ हजार १३१ प्रवाशांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी ४९५ प्रवाशांनी पाच स्टार आणि १४७ प्रवाशांनी चार स्टार दिले आहेत. मात्र, त्यापैकी काहींनी रिअल टाईमच्या मुद्यावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. तर ३३५ प्रवाशांनी एकच स्टार देऊन हे अ‍ॅप नाकारले आहे. एकूण ५५ प्रवाशांनी दोन आणि ९९ जणांनी तीन स्टार दिले आहेत.तेजस्विनी येईना ‘अ‍ॅप’वर : महिला दिनादिवशी खास महिलांसाठी ९ मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेला अद्याप ई-कनेक्ट अ‍ॅपवर स्थान मिळालेले नाही. दररोज एकूण ३० बसेसमार्फत २१८ फेऱ्या होतात. तसेच मागील वर्षभरात अन्य काही मार्ग बंद करून काही नवीन मार्गही सुरू करण्यात आले आहेत. त्याचीही माहिती अ‍ॅपवर अद्ययावत करण्यात आलेली नाही. अ‍ॅपवर सुरुवातीला दिलेले वेळापत्रकच झळकत आहे. दरम्यान, ही माहिती अद्ययावत केली जात असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.