शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

' पीएमपी’ला तेरा वर्षात सोळा अध्यक्ष; आठ अधिकाऱ्यांवर सोपविला होता तात्पुरता भार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 08:35 IST

पुणे व पिंपरी चिंचवड बससेवा एकत्रित करून पीएमपीची २००७ मध्ये निर्मिती करण्यात आली.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची निर्मिती झाल्यापासून मागील १३ वर्षात सोळा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जगतपा हे सोळावे अध्यक्ष ठरले आहेत. तर पुर्णवेळ अध्यक्ष म्हणून कार्यभार सोपविण्यात आलेले आठवेच अध्यक्ष आहेत. आठ अधिकाºयांवर तात्पुरता भार सोपविण्यात आला होता. पुणे व पिंपरी चिंचवड बससेवा एकत्रित करून पीएमपीची २००७ मध्ये निर्मिती करण्यात आली. त्यानंतर सुब्बराव पाटील हे पहिले अध्यक्ष ठरले. त्यांच्यानंतर एक-एक वर्षाच्या कालावधीने अश्विनीकुमार व नितीन खाडे हे अध्यक्ष मिळाले. आॅगस्ट २००९ मध्ये महेश झगडे यांच्याकडे एक महिन्यासाठी अतिरिक्त पदभार आला.  त्यानंतर पाच महिन्यांसाठी शिरीष कारले आणि ११ महिन्यांसाठी दिलीप बंड प्रभारी अध्यक्ष राहिले. आर. एन. जोशी यांची नियुक्ती जानेवारी २०११ मध्ये झाली. त्यांनी तीन वर्ष पीएमपीचे अध्यक्षपद सांभाळले. एवढा कालावधी पीएमपीमध्ये राहणारे ते एकमेव अध्यक्ष आहेत. ते आॅक्टोबर २०१४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर जून २०१५ या नऊ महिन्यातच चार अधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार होता. अभिषेक कृष्णा यांच्या रुपाने पीएमपीला पाचवे पुर्णवेळ अध्यक्ष मिळाले. पण त्यांचीही वर्षभरातच बदली झाली. त्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्तांकडे आठ महिने पदभार सोपविला. मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत तुकाराम मुंढे यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांच्याकडून १२ फेब्रुवारी २०१८ रोजी नयना गुंडे यांनी पदभार स्वीकारला. त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. तसेच जोशी यांच्यानंतर सर्वाधिक काळ अध्यक्षपदही त्यांच्याकडे राहिले. आता राजेंद्र जगताप हे सोळावे अध्यक्ष ठरले असून ते आता किती काळ पीएमपी सांभाळणार, याची उत्सुकता प्रवाशांना आहे.----------------------२००७ पासूनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक        अधिकारी                                                                        कार्यकाळ१)     सुब्बराव पाटील                                           दि. २६ आॅगस्ट २००७ ते ५ नोव्हेंबर २००८२)     अश्विनीकुमार                                             दि. ५ नोव्हेंबर २००८ ते ८ फेब्रुवारी २००९३)     नितीन खाडे                                                  दि. ९ फेब्रुवारी २००९ ते २४ आॅगस्ट २००९४)     महेश झगडे (अतिरिक्त पदभार)                  दि. २५ आॅगस्ट २००९ ते ७ सप्टेंबर २००९५)     शिरीष कारले (अतिरिक्त पदभार)                दि. ७ सप्टेंबर २००९ ते २३ फेब्रुवारी २०१०६)     दिलीप बंड (अतिरिक्त पदभार)                   दि. २३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११७)     आर. एन. जोशी                                          दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४८)     आर. आर. जाधव (अतिरिक्त पदभार)        दि. १ नोव्हेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४९)     श्रीकर परदेशी (अतिरिक्त पदभार)              दि. १२ डिसेंबर २०१४ ते ७ एप्रिल २०१५१०)    ओमप्रकाश बकोरिया (अतिरिक्त पदभार)  दि. ७ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५११)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)            दि. ३० मे २०१५ ते ६ जून २०१५१२)     अभिषेक कृष्णा                                         दि. ८ जून २०१५ ते ८ जुलै २०१६१३)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)          दि. ८ जुलै २०१६ ते २९ मार्च २०१७१४)     तुकाराम मुंढे                दि. २९ मार्च २०१७ ते ८ फेबु्रवारी २०१८१५)     नयना गुंडे                    दि. १२ फेब्रुवारी २०१८ ते २४ जुलै २०२०१६) राजेंद्र जगताप दि. २४ जुलै २०२०

 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेState Governmentराज्य सरकार